खा. विशाल पाटीलpudhari photo
Published on
:
04 Feb 2025, 1:20 am
Updated on
:
04 Feb 2025, 1:20 am
सांगली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सर्वपक्षीय लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने विशाल पाटील यांना केंद्र शासनाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील यंत्रणांत समन्वय राखण्याचे काम या समितीमार्फत केले जाईल. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासासाठीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यस्तरावरती ही समिती काम करेल.
या समितीत खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहू छत्रपती, विशाल पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, सुनील तटकरे, डॉ. भागवत कराड, श्रीरंग बारणे या दहा सदस्यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाबद्दल योजना सुयोग्य पद्धतीने आणि गतीने राबवण्यासाठीचे काम ही समिती करत असते. केंद्र सरकार महाराष्ट्रातील ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक निधी देईल. महाराष्ट्राबाबत दुजाभाव होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
विशाल पाटील, खासदार