मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.File Photo
Published on
:
27 Nov 2024, 1:53 pm
Updated on
:
27 Nov 2024, 1:53 pm
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये सामील झालेले, दिल्लीचे माजी मंत्री कैलाश गेहलोत यांनी बुधवारी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेहलोत यांनी विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मी १७ नोव्हेंबर रोजी दिल्ली सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी मी आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी कैलाश गेहलोत यांनी दिल्लीच्या परिवहन मंत्रीपदाचा राजीनामा आणि 'आप' ला रामराम केला होता. तर दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. २३ नोव्हेंबर रोजी, त्यांची दिल्ली विधानसभा निवडणूक समन्वय समितीचे सदस्य म्हणून दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मान्यतेने नियुक्ती केली.