पूर्वी या शस्त्रक्रिया करून घेणार्यांमध्ये स्त्री आणि पुरुषांचे प्रमाण 90 आणि 10 टक्के होते. हे प्रमाण आता 70 आणि 30 टक्क्यांवर आले आहे. पुरुषांमध्ये केशप्रत्यारोपण, पोटाचा घेर कमी करणे, छातीची गोलाई कमी करणे, नाकाचा आकार बदलणे अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांची मागणी वाढली असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले. साधारण दहा वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या सौंदर्यवर्धक शस्त्रकियांसाठी येणार्या पुरुषांची संख्या मोजकीच होती. परंतु, इंटरनेटच्या माध्यमातून अशा शस्त्रक्रियांची माहिती सहज उपलब्ध होत असल्याने या शस्त्रक्रियांकडे पुरुषांचा ओघही वाढला आहे. हल्ली तरुण वयातच केस गेल्याने चेहर्याचे सौंदर्य हरपल्याच्या भावनेने अनेक पुरुष केशप्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून डोक्यावर पूर्ववत केस रोवून घेतात. तसेच नाकाचा आकार बदलून सौंदर्य खुलविण्याकडे पुरुषांचाही कल हल्ली वाढत आहे, असे प्लास्टिक सर्जन सांगतात. सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया महागड्या असल्याने केवळ उच्चभ्रू वर्गातील लोक त्या करून घेतात असे नाही, तर आता उच्च मध्यम आणि मध्यम वर्गातील पुरुषही मोठ्या प्रमाणामध्ये या शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. पोटाचा वाढलेला घेर कमी करणे, सिक्सपॅक करणे यासाठी केल्या जाणार्या लायपोसक्शन शस्त्रक्रियेची मागणीही वाढत आहे. यामध्ये पोटाची किंवा शरीरातील इतर भागाची वाढलेली चरबी काढली जाते. यासाठी मुख्यत: 30 ते 40 वयोगटातील पुरुष मोठ्या प्रमाणात येत आहेत. विविध माध्यमांमधून दिसणारे रोल मॉडेल यांच्याप्रमाणे आपणही फिट दिसावे, या उद्देशातून हे पुरुष बर्याचदा अशा शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे सौंदर्य शस्त्रक्रिया करून घेणार्यांत पुरुषांचे प्रमाण 30 टक्क्यांवर गेले आहे. अशा सर्जरींमध्ये केशप्रत्यारोपण, छातीची गोलाई कमी करणे (गायनेकोमॅस्टिया), पोटाचा घेर कमी करणे, सिक्सपॅक बनविणे (लायपोसक्शन), नाकाचा आकार बदलणे (रायनोप्लास्टी), कृत्रिमरित्या हनुवटीचा व गालांचा आकार बदलणे, डोळ्याच्या पापण्यांच्या सभोवताली वाढलेली चरबी व त्वचा काढणे (ब्लेफरोप्लास्टी), स्वत:च्या अंगातील चरबी काढून शरीराच्या विशिष्ट चरबीरहित भागात भरणे (फॅट इंजेक्शन), बोटॉक्स इंजेक्शन आणि लेझर सर्जरी यांचा समावेश होतो.
कॉस्मेटिक सर्जरीकडे पुरुषांचाही वाढला कल
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- कॉस्मेटिक सर्जरीकडे पुरुषांचाही वाढला कल
Related
नेताजी न्यूजरूममध्ये आमदार अतुल सावे:685 कोटींचे रस्ते, 1680...
6 minutes ago
0
Maharashtra Schools: राज्यात 18, 19 नोव्हेंबरला शाळा सुरूच र...
7 minutes ago
0
झुंडशाही, पैसे, हुकूमशाहीचे राजकारण चालणार नाही
9 minutes ago
0
नाशकात पैसे वाटपाच्या आराेपावरून भाजप,ठाकरे गटाच्या समर्थकां...
13 minutes ago
0
दिव्य मराठी सेलिब्रिटी टॉक:कितीही पक्षांचे सरकार असो ...अजिब...
17 minutes ago
0
दिव्य मराठी मी चाणक्य:पॉलिटिकल क्विझ 11, विधानसभा अध्यक्षपद ...
27 minutes ago
0
‘बिद्री’त के. पीं.कडून कोट्यवधीचा ढपला : प्रकाश आबिटकर
29 minutes ago
0
‘वाकुर्डे’चे सर्व टप्पे पूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस
29 minutes ago
0
दिव्य मराठी हॉट सीट रामटेक:काँग्रेसच्या मुळकांचे बंड उद्धवसे...
30 minutes ago
0
गुंड म्हमद्या नदाफकडून साथीदारावर गोळीबार
33 minutes ago
0
पश्चिम महाराष्ट्रात मविआ-महायुतीत काट्याची टक्कर:एकूण 70 जाग...
33 minutes ago
0
मुश्रीफांसह कुटुंबीयांना छळणार्या मास्टरमाईंडचा बंदोबस्त कर...
34 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT