नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात पैसेवाटपाच्या आराेपावरून झालेल्या वादाला २४ तास उलटत नाहीत ताेच शहरातील पश्चिम मतदारंसघात शुक्रवारी मतदारांना स्लिप वाटणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटपाचा संशयावरून वाद हाेऊन ठाकरे गट व भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दाेन्ही गटांकडून चाॅपर, रिव्हाॅल्व्हर काढून गाेळीबार केल्याचा आराेप करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शी कुठलाही गाेळीबार झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. घटनेचे वृत्त समजताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अंबड पाेलिसांत धाव घेत कारवाईच्या सूचना दिल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाचे वृत्त समजताच ठाकरे व भाजप समर्थकांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली. ते आमने-सामने आल्याने घोषणाबाजी होऊन तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने साैम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते. सावतानगर भागातील हनुमान मंदिरासमाेर ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे समर्थक मतदारांना घराेघरी स्लिप वाटप करत हाेते. त्याच वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार सीमा हिरे यांचे समर्थक माजी नगरसेवक मुकेश शहाणे व त्यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटपाचा संशय व्यक्त केला. भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना स्लिपांबराेबर पैसे का वाटतात, असे विचारल्यावरून वाद झाला. शाब्दिक वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत भाजप कार्यकर्ते प्रदीप चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत, तर ठाकरे गटाचा कार्यकर्ता सद्दाम शेख हादेखील जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये घटनास्थळी बडगुजर यांचे कार्यकर्ते सदाम शेख व हिरेंचे समर्थक प्रदीप चव्हाण यांच्यात झटापट हाेऊन हाणामारी झाली. भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना स्लिपांबराेबर पैसे का वाटतात, असे विचारल्यावरून वाद झाला. शाब्दिक वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत भाजप कार्यकर्ते प्रदीप चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत, तर ठाकरे गटाचा कार्यकर्ता सद्दाम शेख हादेखील जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये घटनास्थळी बडगुजर यांचे कार्यकर्ते सदाम शेख व हिरेंचे समर्थक प्रदीप चव्हाण यांच्यात झटापट हाेऊन हाणामारी झाली. ठाकरे गटाची गुंडगिरी खपवून घेणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून बॅगही तपासण्याबराेबरच पैसे वाटप, हाणामारीच्या घटनांवर लक्ष दिले पाहिजे. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याची बाब गंभीर आहे. याची चौकशी होणारच आहे. - पंकजा मुंडे, राष्ट्रीय सचिव
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)