मराठय़ांची एकजूट सरकारला घाम फोडणारी आहे. कोणीही आले तरी आम्हाला सुख नव्हते, आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. आता सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे, मस्तीत येऊ नये, असे ते म्हणाले.
मराठ्यांना महायुतीकडून सहजासहजी काहीही मिळालेले नाही. आम्ही आमच्या आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो आहोत. 132पेक्षा जास्त मतदारसंघांत 20 हजाराच्या फरकाने महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. तिथे मराठय़ांनी सभा लावली असती तर पूर्ण राख झाली असती. महायुती जास्त मतांनी निवडून आली म्हणजे आता तुमची जबाबदारी वाढली आहे, असे जरांगे म्हणाले.