कोल्हापूर : देवस्थान समितीतर्फे अंबाबाई मंदिरातील 10 दानपेट्यांची मोजदाद करण्यात आली.Pudhari File Photo
Published on
:
22 Sep 2024, 12:04 am
Updated on
:
22 Sep 2024, 12:04 am
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील 10 दान पेट्यांची मोजदार शनिवारी देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे पूर्ण करण्यात आली. या पेट्यांमध्ये एकूण 1 कोटी 84 लाख 4 हजार 70 रुपयांचे दान भाविकांकडून जमा करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीतर्फे कळविण्यात आली.
बुधवार, दि. 18 ते शनिवार दि. 21 सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत देवस्थान समिती कार्यालयासमोरील जागेत ही मोजदाद करण्यात आली. सीसीटीव्ही, पोलिस व सुरक्षा रक्षकांच्या नजरेखाली देवस्थान समितीच्या कर्मचार्यांनी ही मोजदाद केल्याची माहिती व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी दिली.