खरीप पिकाने निराश बळीराजा रब्बीच्या तयारीत:मागील उत्पन्नात नुकसान झाल्याने शासनाच्या मदतीची गरज

6 days ago 2
खरिपातील सोयाबीन पिकांच्या मळणीनंतर आता बळीराजा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. काही ठिकाणी मशागत, तर काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली. खरिपात अतिपाऊसामुळे कापूस, सोयाबीन उत्पन्न कमी झाल्याचे खरिपाचे दुःख विसरून रब्बी पिकांची आशा ठेवत खरिपातील उत्पन्न भरून काढू या नव्या उमेदीने पेरणीची सुरुवात करताना बळीराजा वर्ग सर्वत्र दिसून येत आहे. बाभुळगाव तालुक्यातील शेतकरी हा रब्बी पिकांची पेरणी, मशागतीच्या मागे आहे. खरीप हंगामामध्ये आलेल्या अतिपावसामुळे तालुक्यातील बरेच भागातील सोयाबीन खराब झाले. त्यामुळे उतरित घट, तर कपाशीच्या झाडाला चार ते पाच बोंडे लागली आहे. काही भागात तूरही जळली आहे, अशी खरीप पिकांची दशा असून त्यातही सोयाबीन नसलेला भाव, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या संपूर्ण अशा या रब्बी हंगामावरच आहे. त्यामुळे शेतकऱ्याची लगबग दिसून येत आहे. खरिपातील केलेला खर्च आता रब्बीतील पिके काढून देणार का? असा प्रश्न देखील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. शासनाच्या धोरणानुसार एका तालुक्यात प्रत्येक महसूल विभागात तीन हजार हेक्टर चणा पिकांचा पेरा असणे ही अट असल्याने तरच त्या तालुक्यात चणा पिकांना पीकविमा लागू होतो. त्यामुळे मागील वर्षी रब्बी पिकांचे वादळी, पावसाने मोठे शेतकऱ्याचे नुकसान झाले. परंतु, या शासनाच्या जाचक अटींमुळे हरबरा पिकाला पीकविमा लागू नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून या तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने चणा पिकांचा पीकविमा यावर शासनाने तोडगा काढून आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी या तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना कष्टाचे दाम देण्याची मागणी रब्बी पिकांमध्ये हरभरा, या भागातील हे मुख्य पिक असून शेतकऱ्याची पसंती यावर्षी हरभरा पिकाला आहे. सरकारने किमान हरभऱ्याला दहा हजार रुपये हमीभाव द्यावा, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करून शेतपिके पिकवावी लागत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना कष्टाचे दाम द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article