गुरुद्वारात फोटोसेशन; जेपी नड्डांसह भाजप कार्यकर्त्यांना बाहेर काढले:सत्संगात अडथळा आल्याने शीख बांधव संतप्त

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हे शुक्रवारी प्रचारासाठी ठाण्यात आले होते. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने त्यांनी ठाण्याच्या गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. भाजप उमेदवार, कार्यकर्ते लवाजम्यासह गुरुद्वारात पोहोचले त्या वेळी तेथे सत्संग सुरू होता. नड्डा आल्यामुळे त्यात व्यत्यय आला. कार्यकर्ते प्रचार आणि फोटोसेशन करू लागले. त्यांच्या या कृतीला तिथल्या सेवेकऱ्यांनी आक्षेप घेतला. इथे असे काही करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्टपणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. सत्संगात राजकीय रंग उमटल्याने संतापलेल्या सेवेकऱ्यांनी नड्डांसह भाजप कार्यकर्त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचा प्रकार घडला. या घटनेची ठाण्यात एकच चर्चा रंगली होती. दहशतवाद्याला तत्कालीन आघाडी सरकारने बिर्याणी खाऊ घातली : नड्डा दरम्यान, ठाणे येथे झालेल्या जाहीर सभेत जेपी नड्डा म्हणाले की, मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने बिर्याणी खाऊ घातली होती. पुलवामा येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी बॉम्बस्फोटात आपल्या जवानांचा बळी घेतला. त्याचा काँग्रेसने निषेध केला नाही. आधी सत्कार केला, मग बाहेर जाण्यास सांगितले गुरुनानक जयंती असल्याने ठाण्याच्या तीन हातनाका परिसरातील गुरुद्वारामध्ये मोठी गर्दी होती. सत्संगचा कार्यक्रमही सुरू होता. याच वेळी जेपी नड्डा हे भाजपचे उमेदवार संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह गुरुद्वारात पोहोचले. तेथील शीखधर्मीय बांधवांनी नड्डा यांचा तातडीने आदरसत्कार केला. मग भाजपच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी सत्संग सुरू आहे याकडे दुर्लक्ष करत फोटोसेशन सुरू केले. ते मोठमोठ्याने बोलत असल्यानेही सत्संगामध्ये व्यत्यय आला. भाविकांमध्ये नाराजी पसरली. शिवाय एकूण कार्यक्रमाला राजकीय रंग येऊ लागल्याने तेथील सेवेकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे नड्डांसह भाजप कार्यकर्त्यांना गुरुद्वाराच्या बाहेर पडावे लागले. मात्र, कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने नड्डांना बाहेर जाण्यासाठी विनंती केल्याचे आयोजकांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article