लुटणे हाच लाटकरांचा व्यवसाय; सुजित चव्हाण यांचा आरोप

2 hours ago 1

कोल्हापूर ः कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचे बंधू शैलेश लाटकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथील संगणक क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांची फसवणूक केली आहे. सर्वसामान्य व्यावसायिक, व्यापार्‍यांना लुटणे हा लाटकर यांचा गृहउद्योग आहे. त्यातूनच त्यांनी मोठी मोहमाया गोळा केली आहे. उच्चभ्रू वस्तीत राहून सर्वसामान्यांचे कैवारी ठरू पाहणार्‍या काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचे पितळ जनतेसमोर उघडे पडले असल्याने लाटकर यांचा पराभव जनताच करेल, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी केला.

काँग्रेसने घोडेबाजार केल्याची लाटकर यांचीच कबुली...

महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठ परिसरातील प्रचारफेरीत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राजेश लाटकर यांनी काँग्रेसने घोडेबाजार केल्याचे मान्य केले. तसेच लाटकरांच्या उमेदवारीला विरोध करणार्‍या नगरसेवकांना टोळकं म्हटले. खासदार शाहू महाराजांची ज्यांच्यामुळे नाचक्की झाली, त्याच अपक्ष उमेदवाराला समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे नेते महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यावर खोटे आरोप करत आहेत.

धनदांडग्या लाटकरांचा केविलवाणा प्रयत्न...

स्वत:चे चारित्र्य स्वच्छ ठरवून महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न धनदांडगे उमेदवार राजेश लाटकर करत आहेत. वाघाचे कातडे पांघरून कोणी वाघ होत नाही. त्याचपद्धतीने सर्वसामान्य कार्यकर्त्याचे ढोंग करून लाटकर सर्वामान्य कार्यकर्ते होऊ शकत नाहीत, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

क्षीरसागर यांच्या बदनामीचे षड्यंत्र

माजी नगरसेवक उत्तम कोराणे म्हणाले, राजेश क्षीरसागर यांच्या कामाची पोेचपावती मतदानाच्या रूपाने जनता देणार आहे. क्षीरसागर यांचा विजय निश्चित असल्याने त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. येत्या चार-पाच दिवसांत जुने व्हिडीओ काढून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण जनतेने वेळीच सावध व्हावे. क्षीरसागर यांचे काम जनतेने पाहिले असून जनतेने मतांच्या रूपाने आशीर्वाद राजेश क्षीरसागर यांना द्यावेत, असे आवाहन केले.

यावेळी भाजपचे महेश जाधव, माजी महापौर बाजीराव चव्हाण, शिवसेनेचे शिवाजी जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, प्रताप देसाई, सुदर्शन सावंत, सरिता हारुगले, पापा पाटील, युवराज बचाटे, गणेश पाटील, कुलदीप गायकवाड, सचिन राऊत, योगेश इंगवले, रूपेश इंगवले, शैलेश साळोखे, पीयुष चव्हाण,कपिल सरनाईक, योगेश चौगले, युवराज साळोखे, शुभम शिंदे, सचिन पवार, श्रीजीत साळोखे,संग्राम जरग, शेखर पोवार, गुरू लाड, विशाल भोंगाळे आदी उपस्थित होते.

राजेश लाटकर बंधूकडून कोट्यवधींची फसवणूक

राजेश लाटकर यांचे बंधू शैलेश यांची मायक्रोमेक कॉम्प्युटर नावाची फर्म आहे. या माध्यमातून त्यांनी कोल्हापुरातील एका व्यावसायिकाची 1 कोटी 57 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे त्या व्यावसायिकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. लाटकर यांनी अनेकांना फसवले असल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील संगणक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अनेक कंपन्यांनी उधारी देणे बंद केले आहे. बाहेरील कंपन्या शासकीय निविदा भरण्यासही धजावत नसल्याचे त्या व्यावसायिकाने सांगितले असल्याची माहिती चव्हाण यांनी सभेत दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article