मौलाना आझादांमुळे झाली भाषावार राज्यांची निर्मिती:मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा. डॉ. अब्दुस सलाम यांचे प्रतिपादन
2 hours ago
1
देशाची फाळणीला ज्याप्रमाणे मौलाना आझाद यांनी प्रखर विरोध केला होता. त्याचप्रमाणे फाळणीनंतर देशात जातीच्या आधारावर निर्माण होणाऱ्या राज्यांनाही मौलानांनी विरोध दर्शवला होता.मौलाना आझाद यांना देशाच्या फाळणीचे दु:ख संपत नव्हते तर देशात जातीच्या संख्याबळाप्रमाणे राज्य निर्मितीचा मुद्दा पुढे येताच मौलानांनी विरोध करुन ते हाणून पाडले. व देशात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात आली, असे प्रतिपादन मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम यांनीकेले. मौलाना आझाद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. केले. मखदूम सोसायटीच्यावतीने मौलाना आझाद यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कौमी एकता सप्ताहात दुसरे व्याख्यानमाला आलमगीर येथील मातोश्री उर्दू हायस्कूल व अलहाज शेख अब्दुल अजीज ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् मध्ये आयोजित केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरुर, मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, मुख्याध्यापक जमीर शेख, प्रा डॉ. एजाज शेख, आफरीन शेख, नसरीन तांबोली, मुज्जंमील शेख आदि उपस्थित होते. प्रा. डॉ. सलाम म्हणाले, मौलाना आझाद हे जाणून होते की, या देशात धर्माच्या आधारावर राज्य निर्माण झाल्यास आराजकता वाढेल व दोन समाजात अगोदरच फाळणीमुळे दरी वाढलेली होती, त्यात अजून भर पडली असती, असे मौलानांना वाटत होते. त्यामुळेच जातीवर आधारित राज्यांची निर्मिती न होता, ती भाषावार झाली. कार्यक्रमाची सुरुवात मुनीरा शेख यांच्या कुराण पठणाने झाली. तर हम्द खुतेजा सय्यद यांनी सादर केली. नातेपाक कैस शेख यांनी प्रस्तुत केली. मदीहा व इतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक आबीद खान यांनी, सूत्रसंचालन निशात खान व शेख अंजुम यांनी, तर आभार अंजुम शेख यांनी मानले .
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)