Published on
:
21 Jan 2025, 11:41 pm
Updated on
:
21 Jan 2025, 11:41 pm
नवी दिल्ली : कोरोना काळात लोकांना पक्के समजले होते की सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपले आरोग्य. ते जर बिघडले तर सगळं असूनही काहीच उपयोग नाही! मात्र आजच्या काळात आपण सर्वजण आपल्या धावपळीच्या जीवनात अडकलो आहोत. काम, घर आणि इतर जबाबदार्यांमध्ये, आपल्या आरोग्याची काळजी घेणे कठीण होऊ शकते. पण दररोज चालण्यासारखी एक छोटीशी सवय आपल्या आरोग्यात सुधारणा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. चालण्याच्या सहजसोप्या व्यायामामुळेही अनेक लाभ होतात व अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते. त्याबाबतची ही माहिती...
हृदयरोगांपासून बचाव : दररोज चालल्याने हृदय निरोगी राहते. हे रक्तदाब नियंत्रित करते, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि हृदयाच्या स्नायूंना बळकटी देते.
लठ्ठपणा कमी करते : चालण्याने कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
मधुमेहावर नियंत्रण : दररोज चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
हाडे मजबूत करते : चालण्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.
ताण कमी करणे : चालण्यामुळे ताण आणि चिंता कमी होते. हे मनाला शांत करते आणि चांगली झोप येण्यास मदत करते.
पचन सुधारते : चालण्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे : दररोज चालल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
किती वेळ चालावे? बहुतेक डॉक्टर दिवसातून किमान 30 मिनिटे चालण्याचा सल्ला देतात. तुम्ही ते प्रत्येकी 15 मिनिटांच्या दोन वेळा देखील विभागू शकता.