Published on
:
04 Feb 2025, 12:35 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:35 am
चिपळूण : शहरातील खेंड गणेश मंदिर भागात अज्ञाताने 70 हजारांची घरफोडी केली आहे. यामध्ये रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना दि. 31 जानेवारी रोजी रात्री घडली.
याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील खेंड भागातील रुद्र हा बंगला अज्ञाताने फोडून ऐवज चोरून नेला. यामध्ये फिर्यादी महिलेच्या पतीचा अपघात झाल्याने ते पुणे येथे उपचारांसाठी गेले होते. यादरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. शेजारी राहणारे सुरेंद्र रेडीज यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने संबंधितांना यांनी माहिती दिली. यानंतर त्या चिपळुणात दाखल झाल्या.
यावेळी अज्ञात चोरट्याने बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील दोन बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविली. यामध्ये 15 हजार रूपये व 22 हजार रूपयांची अशा दोन सोन्याच्या अंगठ्या, तीन हजार रूपये किंमतीची तीन चांदीची नाणी व 30 हजार रोख रक्कम अज्ञाताने लांबविली. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला.