रमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करताना आ. शेखर निकम.pudhari photo
Published on
:
03 Feb 2025, 12:45 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:45 am
चिपळूण शहर : शहरातील तलावांच्या संवर्धनासाठी आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील रामतीर्थ व विरेश्वर तलावाच्या संवर्धनासाठी निधी मिळावा, यासाठी आ. निकम यांनी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत निधीची मागणी केली आहे. यावेळी चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
पाच वर्षांच्या कालखंडात चिपळूण शहराच्या विकासासाठी आ. शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे. वाशिष्ठी नदीवरील पेठमाप व शंकरवाडीला जोडणारा पूल, पवन तलाव व गोवळकोट मैदान सुशोभिकरण, नारायण तलाव आदी कामांसाठी आ. निकम यांनी पुढाकार घेतला आहे. शहराच्या वैभवात भर पडावी यासाठी आ. निकम यांनी ना. पंकजा मुंडे यांची भेट घेतली.
राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत शहरातील विरेश्वर तलाव संवर्धनासाठी 1 कोटी 51 लाख 65 हजार 664 रूपये व रामतीर्थ तलाव संवर्धनासाठी 3 कोटी 79 लाख 83 हजार 799 रूपयांच्या निधीस मंजुरी मिळून प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर ना. पंकजा मुंडे यांनी सकारात्मकता दर्शवली.