जम्मू-काश्मिरमधून मिळवले बनावट परवाने अन् त्याआधारे नगरसह तीन जिल्ह्यात नोकरी, एक आरोपी नऊ वर्षांपासून होता अहिल्यानगरमध्ये

2 hours ago 1
सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीसाठी बनावट बंदूक परवाना घेऊन, त्याद्वारे नोकरी मिळवणाऱ्या जम्मू काश्मीर येथील आठ जणांसह बनावट परवाना देणाऱ्यास अहिल्यानगर येथील तोफखाना पोलिस व दक्षिण कमांड मिलीटरी इंटेलिजन्स (पुणे) यांच्या पथकाने जेरबंद केले. या प्रकरणातील संशयितांनी जम्मू काश्मिरमधून बनावट परवाने मिळवले आणि अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, श्रीगोंदा, सोनई येथे सुरक्षा रक्षक म्हणून करायचे नोकरी करायचे, अशी माहिती तपासात समोर आली आहे. संशयितांकडील शस्त्र परवान्याची खात्री करण्यासाठी राजौरी (जम्मू काश्मिर) येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घेण्यात आली. शस्त्र परवाने हे बनावट असल्याचे त्यांनी कळवताच सर्वांना ताब्यात घेण्यात आले. यात संशयितांपैकी एक शेर अहेमद गुलाम हुसेन (रा. कलाकोट, राजौरी, जम्मू व काश्मिर) याने आरोपींना सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी बनावट शस्त्र परवाने दिले. तसेच, त्यानेच १२ बोअर गन पुरवल्याचे व तोच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले व्यक्ती ज्या सुरक्षा रक्षक कंपनीकडे नोकरी करायचे त्यांचीचौकशी व तपास केला जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिस हेड कॉन्स्टेबल भानुदास खेडकर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे करत आहेत. तारकपूर बस स्टँडवर गनची खरेदी शब्बीर मोहंमद इक्बाल हुसैन गुज्जर याने सन २०१५ मध्ये शेर खान (मु.रा. जम्मु काश्मीर ह.रा. पुणे) या व्यक्तीकडून अहिल्यानगर येथील तारकपूर बस स्टँड येथे गन व काडतुसे खरेदी केल्याचे तपासात सांगितले. इतरांनी त्यांची शस्त्रे, काडतुसे व परवाने हे राजौरी जम्मू-काश्मीर येथून विकत घेतल्याचे तपासात सांगितले. अटक केलेल्या नऊ जणांपैकी शस्त्र परवाने पुरवणारा शेर अहेमद गुलाम हुसेन हा सन २०१५ पासून म् अहिल्यानगरमध्ये होता. उर्वरित आठ जण त्याच्यामार्फत नगरमध्ये आले. या प्रकरणी तपास सुरू असून, ज्या सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये कार्यरत होते, त्या एजन्सीकडेही चौकशी करणार असल्याचे तपासी अधिकारी आनंद कोकरे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article