जरांगेंचे आंदोलन लाडक्या बहिणींपुढे फोल:मराठवाड्यात लोकसभेप्रमाणे जरांगे फॅक्टर चालला नाही
2 hours ago
1
मराठवाड्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही जरांगे फॅक्टर चालणार असे चित्र होते. मात्र, यावर लाडक्या बहिणीने मात केल्याचे चित्र दिसून आले. एकूणच महायुतीला मराठवाड्यात ४० जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मराठवाड्यात जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरला. जरांगेंच्या मराठा आंदोलनावर विसंबून परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला ७ जागा गमवाव्या लागल्या. २०१९ मध्ये मराठवाड्यातील ४६ पैकी १२ जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. या वेळी सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हे तीन ज्वलंत विषय आणि उबाठासारख्या तिसऱ्या मित्रपक्षाची साथ मिळाली, मात्र सात जागा गमवाव्या लागल्या. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे लागले होते. जरांगेंच्या आदेशामुळे भाजपचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गजांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. या वेळी त्यांचे पुत्र संतोष आणि मुलगी संजना दोघे विजयी झालेत. देशमुखांची गढी हादरली, धीरज देशमुखांना मतदारांनी नाकारले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र या वेळी निवडणुकीच्या मैदानात होते. यापैकी धीरज देशमुख यांना मतदारांनी माघारी पाठवत देशमुखांच्या गढीला हादरा दिला. ठाकरे गटाच्या सुरेश बनकर यांनी सत्तार यांना शेवटपर्यंत झुंजवले महायुतीतील वादग्रस्त मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरली. ठाकरे गटाचे सुरेश बनकर यांनी त्यांना झुंजवले. सत्तारांना २,४२० मतांनी विजय मिळाला. बहीण-भाऊ एकत्र आल्याने बीडचा गड धनंजय मुंडे यांनी राखला
पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे ही भावा- बहिणींमधील दुरी अजित पवार गट महायुतीत आल्याने संपुष्टात आली. गेल्या दहा व र्षांपासून एकमेकांना शह देणारे धनंजय-पंकजा मुंडे या वेळी एकत्र होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)