जळगाव‎ एसपी कार्यालयासमाेर एक दिवसाआड‎ चाेरी, बसस्थानकातून एक लाख लंपास‎:आठवड्यात तीन घटनांत पावणेतीन लाख रुपये लांबवले‎

3 hours ago 1
शहरातील जिल्ह पाेलिस अधीक्षक ‎‎(एसपी) कार्यालयाच्या समाेरच १०० ‎‎पावलांवर नवीन बसस्थानक आहे. इथे ‎‎आठवड्यात बसमध्ये चढताना तिघांचे ‎‎पावणेतीन लाख रुपये चाेरट्यांनी‎लांबवले आहेत. अर्थात, सरासरी एक ‎‎दिवसाआड चाेरटे प्रवाशांच्या खिशावर ‎‎डल्ला मारताहेत. या ठिकाणी पाेलिस ‎‎चाैकी आहे पण तेथे पाेलिस नसतात. ‎‎सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण ते कमी ‎‎क्षमतेचे असल्याने शाेपीस ठरताहेत.‎ शनिवारी दुपारी धुळे जिल्ह्यातील‎अजंदे येथील तरुण शेतकऱ्याने हरबरा‎लागवडीसाठी मावशीकडून घेतलेले‎एक लाख रुपये चाेरट्यांनी लंपास‎केले. दरम्यान, येथील सीसीटीव्ही‎कॅमेऱ्यांत चाेरटा दिसताे असून, ताे अस्पष्ट आहे. महेंद्र राजाराम मराठे‎(वय ३५, रा. पाटीलवाडा, अजंदे, जि. धुळे) हा तरुण‎शेतकरी जळगावातील महाबळ काॅलनीत राहणाऱ्या‎मावशीकडे शनिवारी शेतात हरभरा लावण्यासाठी‎उसनवार पैसे घेण्यासाठी आला हाेता. त्याच्या मावसाने‎शनिवारी दुपारी साडेतीन वाजता नवीन बसस्थानकात‎साेडले. महेंद्र मराठेने पॅन्टच्या उजव्या खिशात हे पैसे‎ठेवले हाेते. पावणेचार वाजेच्या सुमारास‎जळगाव-मांजराेद या बसमध्ये चढताना गर्दी हाेती. ताे‎बसच्या पहिल्या पायरीवर असताना त्याने पैसे तपासले‎तेव्हा ते हाेते. त्यानंतर मागून जाेरदार धक्का मारला गेला‎त्यामुळे त्याने खिशावरील हात काढून बसचा राॅड‎धरला. आत गेल्यावर पुन्हा खिसा तपासला तर पैसे‎नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने‎जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.‎त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.‎ सीसीटीव्ही कमी क्षमतेचे, फुटेज अस्पष्ट‎ सीसीटीव्हीमध्ये संशयित चित्रित‎ जिल्हापेठ पाेलिसांनी या चाेरीच्या‎तपासासाठी बसस्थानकातील सीसीटीव्ही‎कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यात बसमध्ये‎चढण्याचे नाटक करून पैसे चाेरून माघारी‎फिरलेला काळा रंगाचा शर्ट घातलेला तरुण‎चाेरटा चित्रित झाला आहे. पाेलिस त्याच्या‎मागावर असल्याचे सांगण्यात येते आहे.‎ पाेलिस चाैकी केवळ नावालाच‎ बसस्थानकात हाेणाऱ्या चाेऱ्यांवर नियंत्रण‎ठेवण्यासाठी पाेलिस चाैकी उभारलेली‎आहे; परंतु येथे कधीच पाेलिस नसतात.‎चाेरीच्या लागाेपाठ घटना समाेर आल्यावर‎येथे अधूनमधून पाेलिस गस्त घालतात.‎दाेन-चार दिवस हाेमगार्ड पाठवले जातात.‎नंतर बसस्थानक रामभराेसे हाेते.‎ आठवड्यातील घटना‎ २८ सप्टेंबर : सकाळी १०.३०‎वाजता जळगाव-शिंदखेडा‎बसमध्ये चढत असताना‎वाघनगरातील मनीषा पाटील‎यांचे २१ हजार चाेरीला गेले.‎ ३ ऑक्टाेबर : दुपारी २.३०‎वाजता जळगाव येथून पाचाेरा‎बसमध्ये चढताना पिंप्राळाच्या‎शीतल पवार यांचे ५० रुपये‎चाेरट्याने लांबवले.‎ ५ ऑक्टाेबर : दुपारी ३.४५‎वाजता जळगाव-मांजराेद‎बसमध्ये चढत असतान महेंद्र‎मराठे या प्रवाशाचे १ लाख‎रुपये चाेरीला गेले आहेत.‎ दिव्य मराठी थेट प्रश्न‎ - राकेश माणगावकर, पीआय, जिल्हापेठ‎ नेत्रम अंतर्गत अधिक क्षमतेचे‎दाेन सीसीटीव्ही कॅमरे लावणार‎ प्रश्न : बसस्थानकात गस्त नाही का?‎ उत्तर : आठवडाभरात इथे तीन माेठ्या‎चाेऱ्या झाल्या आहेत. पाेलिसांची गस्त‎असते पण ती आणखी वाढवण्यात येईल.‎ प्रश्न : इथे पाेलिस नव्हे हाेमगार्ड का?‎ उत्तर : हाेमगार्डचे मनुष्यबळ पाेलिस‎दलाला मिळाले हाेते. तेव्हा त्यांची नेमणूक‎बसस्थानकात करण्यात आली हाेती.‎ प्रश्न : काय उपाययाेजना करणार?‎ उत्तर : बसस्थानकात कॅमेरे कमी क्षमतेचे‎व अनेकदा बंद पडतात. पाेलिस दलाच्या‎नेत्रमचे अधिक क्षमतेचे दाेन कॅमेरे लावले‎जातील. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहे.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article