Published on
:
22 Jan 2025, 12:32 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:32 am
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती होणार होती. मात्र, शिक्षण आयुक्त यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याने कंत्राटी शिक्षक भरती रखडल्याने भावी शिक्षक चिंतेत असून, भरती प्रक्रिया सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेत 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोन शिक्षकांच्या जागी एक कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्ह्यात 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील दोन शिक्षकांतून एक शिक्षकांचे समायोजन इतर शाळेत करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही शिक्षक भरती सुरु झाली नसल्याने भावी शिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाले आहे. त्यानंतर तत्काळ कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होईल, अशी आशा शिक्षकांनी व्यक्त केली होती. परंतु शिक्षण आयुक्तांनी भरती प्रक्रियेला तत्पुरती स्थगिती दिल्याने भरती प्रक्रिया रखडली असून, कंत्राटी शिक्षक भरती केव्हा होणार, याकडे भावी शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
कंत्राटी भरती प्रक्रिया राबवावी
शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडला आहे. त्यानंतर आता दुसर्या टप्प्यातील प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे भावी शिक्षकांनी सरकारने आभार मानले आहेत. मात्र, त्याआदीच कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया राबविणे गरजचे होते, अशी अपेक्षा जिल्ह्यातील भावी शिक्षक व्यक्त करत आहेत.