टाकळी ढोकेश्वर गटातून राणी लंके यांना मताधिक्य मिळणार:कोरोना संकटात विरोधक कुठे होते- प्रकाश गाजरे
5 days ago
2
टाकळी ढोकेश्वर गटातील २२ गावांच्या सरपंचांपैकी १७ सरपंच महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित होते. पोखरीचे सरपंच सतीश पवार तसेच वारणवाडीचे सरपंच संजय काशिद यांनी खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत राणी लंके यांना पाठिंबा दिला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांना मोठा धक्का बसला आहे. या गटातून लंके यांना मोठे मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी दिली. गाजरे म्हणाले, लंके कुटुंबाचा केवळ निवडणुकीपुरताच नव्हे, तर सतत मतदारसंघाशी संपर्क असतो. विरोधक मात्र उमेदवारी मिळाल्यानंतर भुछत्रासारखे उगवले. कोरोना संकटात खा. लंके यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांना जीवदान दिले. आज मते मागण्यासाठी येणारे कोरोना संकटात कुठे होते? त्यांनी किती रुग्णांना आधार दिला याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आवाहन गाजरे यांनी दाते यांना दिले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा तसेच पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही टाकळी ढोकेश्वर गटातून नीलेश लंके यांना मताधिक्य होते. या निवडणुकीतील राणी लंके यांचे मताधिक्य नीलेश लंके यांच्या मागील दोन निवडणुकांपेक्षा अधिक असणार असल्याचा दावा सरपंच गाजरे यांनी केला. खासदार लंके यांनी टाकळी ढोकेश्वर गटात कोट्यवधींची विकास कामे केली, असे गाजरे यांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)