Published on
:
03 Feb 2025, 5:24 am
Updated on
:
03 Feb 2025, 5:24 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडा, मेक्सिको आणि चीनवरील आयात वस्तूंवर कर लावण्याच्या घोषणेमुळे ट्रेड वॉर आणखी तीव्र होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारांत घसरण झाली आहे. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटले आहेत. आशियाई बाजारातील नकारात्मक संकेतांदरम्यान आज सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६९५ अंकांनी खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०० हून अधिक अंकांनी घसरला. सकाळी १०.४० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स सुमारे ५९० अंकाच्या घसरणीसह ७६,९२० वर तर निफ्टी २३,३०० च्या खाली व्यवहार करत होता.
बाजार खुला होताच मोठा फटका
आजच्या सुरुवातीच्या मोठ्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.६३ लाख कोटींनी कमी होऊन ४१९.२१ लाखांवर आले.
सर्व क्षेत्रीय कोणते शेअर्स घसरले?निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. मेटल निर्देशांक सर्वाधिक २ टक्के घसरला आहे. रियल्टी २ टक्के, निफ्टी आयटी १.४ टक्के घसरला आहे.