संभाजीनगर जिल्ह्यामधील एका गावाच्या सरपंचानं अनोखा आंदोलन केलं आहे. गावातलं एक काम रखडल्याने त्यांनी हे अनोखा आंदोलन केलंय. नेमकं कशा प्रकारचं हे आंदोलन आहे, बघा व्हिडीओ
कधी महावितरणच्या डीपीवर बसून, कधी कमरे इतक्या पाण्यात उभा राहून, कधी चिखलात बसून, कधी विहिरीत बसून, कधी लाखभर रुपयांच्या नोटा उधळून, तर कधी स्वतःची गाडी जाळून. अशा हटके आंदोलनाची परंपरा जपणाऱ्या मंगेश साबळे यांनी आज चक्क साडी नेसून आंदोलन केलं आहे. मंगेश साबळे हे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई गावाचे सरपंच आहेत. या गावात जलजीवन मिशनचं काम रखडलंय. त्यामुळे महिलांना दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय. याचाच निषेध म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी साडी नेसून आणि डोक्यावर हंडा ठेवून जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन केलं. ‘चार वर्ष झाले जलजीवन मिशनच उद्घाटन झालं एक कोटी 80 लाखाचं इस्टिमेट तयार केलं. बघा मित्रहो चार वर्ष झाले पाईप लाईन मध्ये दाबून टाकले अजून काम झालं नाही. कुठ काम अडकलाय कुठ घोडा मेंड खातोय का चार चार वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागताय पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे.’, असं म्हटलं होतं. सरपंच साबळे यांवर असं हटके आंदोलन करण्याची वेळ का आली? मंगेश साबळे आपल्या हटके आंदोलनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी आपली गाडी देखील जाळली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर देखील त्यांनी हल्ला चढवला होता. तेच साबळे आता साडीतल्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Published on: Feb 02, 2025 11:18 AM