तिन्ही मतदारसंघांमध्ये महिला मतदानात 55,823 ची वाढ:2019 च्या तुलनेत महिलांच्या मतांमध्ये 2.3 टक्क्यांची वाढ

5 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन मतदारसंघांत २०१९च्या तुलनेत या वेळी २.३ टक्के मतांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर मतदान करणाऱ्या महिलांची संख्याही ५५,८२३ने वाढली आहे. हा वाढीव टक्का जय-पराजयाच्या गणितात महत्त्वाचा ठरेल. शहरातील दोन मतदारसंघांत एकूण मतदानाच्या टक्केवारीत घट झाली असली तरी महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. मध्य मतदारसंघ २०१९ मध्ये ३ लाख ३५ हजार ८३५ मतदार होते. त्यापैकी १ लाख ९७ हजार ७६४ मतदारांनी (५९.७७ टक्के) मतदान केले. या वर्षी ३ लाख ६८ हजार ९७० मतदारांपैकी २ लाख १८ हजार ९६६ मतदारांनी मतदान केले. १०,५११ जास्तीच्या पुरुषांनी, तर १५,६४८ जास्त महिलांनी मतदान केले. २०१९ च्या तुलनेत मध्य मतदारसंघात ०.४२ टक्के मतदान घटले आहे. असे असले तरी महिलांचे मतदान २ टक्क्यांनी वाढले आहे. पश्चिम मतदारसंघ ३ लाख ३६ हजार २१ मतदारांपैकी २०१९मध्ये १ लाख ९९ हजार ७८९ मतदारांनी (५९.४६ टक्के) मतदान केले होते. या वर्षी ४ लाख ७ हजार ९७ मतदारांपैकी २ लाख ४६ हजार ६३८ मतदारांनी (६१.१९ टक्के) मतदान केले. यामध्ये २० हजार ६२५ अधिक पुरुषांनी व २७ हजार ८२० अधिकच्या महिलांनी मतदान केले. २०१९च्या तुलनेत १.१२ टक्के मतदान वाढले. त्यात महिलांच्या मतदानात तब्बल ४ टक्के वाढ झाली. पूर्व मतदारसंघ २०१९ मध्ये ३ लाख १९ हजार २०९ मतदारांपैकी १ लाख ९५ हजार ४५६ मतदारांनी (६१.२३ टक्के) मतदान केले. या वर्षी ३ लाख ५४ हजार ६३३ पैकी २ लाख १५ हजार ०२९ मतदारांनी (६२.१७) टक्के मतदान केले. मागील तुलनेत ८ हजार २८७ अधिक पुरुषांनी व १२ हजार ३५५ अधिक महिलांनी मतदान केले. या वेळी महिलांच्या मतदानात १ टक्का वाढ झाली असून याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article