तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की, गद्दारांचे; उद्धव ठाकरे यांचा मोदींवर हल्लाबोल

6 days ago 2

”देशाचे पंतप्रधान हे भाजप आणि गद्दार मिंधेच्या प्रचाराला येत आहेत. मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की, गद्दारांचे पंतप्रधान. तुम्ही जर गद्दारांचे पंतप्रधान असाल आणि त्यांच्या प्रचाराला येत असाल, तर तुम्ही पंतप्रधानपदी बसू नका. तुम्ही पंतप्रधानपदावरून पायउतार व्हा आणि गद्दाराच्या टोळीत सामील व्हा”, असं म्हणत गद्दार मिंधेच्या प्रचारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. आज वैजापूर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार दिनेश परदेशी यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

शिवसेन पक्षप्रमुख बाळसाहेब ठाकरे म्हणायचे, निवडणुकीत पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांनी कोणत्याही एका पक्षाच्या प्रचाराला येऊ नये. जर त्यांना प्रचाराला यायचं असेल, तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि मग त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी फिरलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्यांनी 370 कलम काढण्यास विरोध केला, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसलेत, असं अमित शहा म्हणालेत. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”अमित शहाजी काश्मीरमध्ये तुम्ही मुफ्ती मोहम्मद सोबत बसला होता, तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं केलं होतं.”

नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत ते म्हणाले की, ”पंतप्रधानजी माझा रिमोट कोणाच्या हातात आहे, हे पाहण्याचा प्रयत्न करू नका. मी बाळासाहेबांचा सुपुत्र आहे. तुमच्या हातात माझा रिमोट राहिला नाही, तर काँग्रेसच्या हातात मी शिवसेनेचा रिमोट कसा जाऊ देणार.”

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

– आज सुद्धा माझा शेतकरी तळमळतोय, कापसाला भाव नाही, सोयाबीनला नाही, माता भगिनी म्हणताहेत महागाई वाढतेय. आणि त्यांना तुम्ही काय सांगताय कटेंगे तो बटेंगे? भाजपचा नारा कटेंगे तो बटेंगे नाही, लुटुंगे और बाटेंगे. हे त्यांचं काम आहे.

– यांचे दाखवायचे दात वेळगे आणि खायचे दात वेगळे आहेत. महाराष्ट्र को लुटुंगे और दोस्तोंको बाटेंगे. लूट आपली होतेय. आपला आमदार व्हायला पाहिजे म्हणून तर आलोच आहे. तुमच्या आयुष्यासाठी आलोय आपल्या महाराष्ट्रासाठी आलोय.

– डोळ्या देखत आपला महाराष्ट्र लुटून गुजरातला नेताहेत मग आम्ही काय षंडासारखं बघत बसावं, असं मोदी आणि शहांची कल्पना आहे की काय? आता तुम्ही न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. पण माझा महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तो कौरवांचा बाप धृतराष्ट्र नाहीये. तो सगळं बघतोय कसं तुम्ही माझा महाराष्ट्र लुटताय.

– मोदीजी म्हणाले होते लोकसभेला चारसो पार, पण लसून गेला चारसो पार. त्यांनी ऐकलं तुमचं आणि तोच गेला चारसो पार. मोदी को नही जमा वो मै करके दिखाता हूं. महागाई वाढत चालली आहे. आणि यांच्या नुसत्या थापा ऐकत चाललो. अंधळेपणाने मत द्यायचं सोडून द्या.

– पन्नास खोके आता सुट्टे पैसे झालेत. पण हा जो आपल्या पाठीवरती आणि छातीवरती वार केलाय, याचा सूड तुम्ही उगवणार आहात की नाही? पन्नास खोके नॉट ओके. आता आपली वेळ आली, यावेळेला आपली सटकली पाहिजे.

– मर्दाची अवलाद असलास तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुझ्या वडिलांचा फोटो लावून मैदानात उतरा. आणि मग शिवसेना कोणाची ते जनतेला ठरवू द्या. नामर्दांनी शिवसेनेला आव्हान द्यायचं नाही. नामर्दांनी शिवसेना नाव चोरून, निशाणी चोरून, हिंदुहृदयसम्राटांचा फोटो चोरून आव्हानं द्यायच्या भानगडीत पडू नका. अरे नामर्दांनो, हा महाराष्ट्र लेच्यापेच्यांचा प्रदेश नाही. हा महाराष्ट्र वाघांची पैदास करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article