येरला येथील शिरभाते मंगल कार्यालयाजवळ त्या युवकाचा मृतदेह निर्वस्त्र आढळून आला.Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 8:57 pm
Updated on
:
24 Jan 2025, 8:57 pm
अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) उघडकीस आली. मोर्शी ते अमरावती मार्गावर येरला येथील शिरभाते मंगल कार्यालयाजवळ त्या युवकाचा मृतदेह निर्वस्त्र आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दिनेश उईके (२०, घोंडगव्हान) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.२४) मोर्शी येथे शिरभाते मंगल कार्यालयाकडून जाणार्या नागरिकांना काटेरी कुंपणात तरुणाचा मृतदेह नग्नावस्थेत देह दिसला. याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथक तिथे पोहोचले.अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत,उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर, अमरावती येथील ग्रामीण पोलीस, अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्शी पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. श्वानपथक व मोबाईल युनिट तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद पोतदार यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आले.
मृतक अल्पवयीन तरुण हा दि.२३ जानेवारी रोजी संध्याकाळी दहा वाजताचे सुमारास वडिलांना घरून जाताना सिंभोरा चौकातून परत येतो म्हणून सांगून गेला होता. मात्र तो रात्री घरी परत आला नसल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन माझा मुलगा घरी परत आला नसल्याची तक्रार दिली होती.शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी येरला गावाजवळील असलेल्या गौरक्षण नजीक शेताच्या काटेरी कुंपणात त्याचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला.मृतदेह ज्या बाजूला आढळून आला त्या शेतात त्याच्या चपला व उजव्या बाजूला पॅन्ट व एक थैली आढळून आली होती.