पुढच्या पाच वर्षांच्या कालावधीत विधानसभेला विरोधी पक्षनेता नसेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी 145 जागांची गरज आहे, तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या एक दशांश आमदार कोणत्याही एका पक्षाकडे असणे आवश्यक आहे. म्हणजेच 28 आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल, मात्र तसे चित्र महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा ही विरोधी पक्षनेत्याशिवाय पाहायला मिळेल.
महाराष्ट्रातील निकालाचे विश्लेषण करणार
महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असून आम्ही याचे विश्लेषण करणार आहोत, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली. महाराष्ट्रातील भावा-बहिणींचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या मेहनतीसाठी आभार मानतो, असेही ते म्हणाले. झारखंडमधील इंडिया आघाडीचा विजय संविधानासह जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण करेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
दिग्गजांना धक्का! विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल का?
काँग्रेसच्या या दिग्गजांना धक्का
बाळासाहेब थोरात – संगमनेर
पृथ्वीराज चव्हाण – कराड दक्षिण
यशोमती ठाकूर – तिवसा
हर्षवर्धन पाटील – इंदापूर
राजेश टोपे – घनसावंगी
शंकरराव गडाख – नेवासा