पूर्वी विद्यार्थ्यांना कंटेनरच्या डब्यात बसून शिक्षण घ्यावे लागत होते.Pudhari News Network
Published on
:
04 Feb 2025, 8:11 am
Updated on
:
04 Feb 2025, 8:11 am
कासा : डहाणू मधील सरावली मोरपाडा या जिल्हा परिषदेची शाळा गेल्या दीड वर्षांपासून कंटेनरच्या डब्यात शाळा भरवणार्या शाळेमधील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. माध्यमांनी हा विषय उचलून धरताच, डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पश्चिम रेल्वे च्या कॉरीडोर मुळे मोर पाडा मधील शाळेची बाधित इमारत जमीनदोस्त झाली होती. त्यांना तात्पुरती सुविधा ही कंटेनर मध्ये करण्यात आली होती.
मात्र शाळेची दयनीय अवस्था पाहून आमदरांनी त्वरित रेल्वेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला व नवीन शाळा तातडीने बांधण्याचे निर्देश दिले. या पाठपुराव्यामुळे नवीन इमारत उभी राहिली असून विद्यार्थ्यांसाठी सुशोभित आणि प्रशस्त शिक्षणसंस्था उभी करण्यात आली आहे.
नवीन शाळा मिळाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थी आनंदित झाले असून त्यांनी आमदार विनोद निकोले यांचे मनःपूर्वक आभार मानले. या सोहळ्याला डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, सरवलीचे सरपंच कॉ. देवराम दळवी, सोगवे सरपंच कॉ. लहानी दौडा, डेहणे पळे सरपंच कॉ. दत्तू भोंडवा, उपसरपंच, सदस्य तसेच गटविकास अधिकारी पल्लवी शस्ते, गट शिक्षण अधिकारी माधवी, मेनू इराणी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद झळकत होता. नवीन इमारतीमुळे त्यांना आता योग्य शैक्षणिक सुविधा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कंटनेरमध्ये बसून विद्यार्थी हालअपेष्टा सहन करत शिक्षण घेत होते
बीएचसीसीआयएल मुंबई याने बांधून दिलेल्या दोन कंटेनरमध्ये शाळा भरत असे. पावसाळ्यात कंटेनर गळत असतात तर उन्हाळ्यात खूप गरम होते. त्यामुळे विद्यार्थी संख्या रोडावली होती. रेल्वे कॉरिडोर प्रकल्प चालू असल्याने त्यातून कंपनीकडून मिळणारा सीएसआर फंड हा प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरातील गावातील ग्रामपंचायत , शाळा , आरोग्य इतर सेवेसाठी वापरला जात असे.
कंटेनरमध्ये विद्यार्थ्यांचे व्हायचे हाल
विद्यार्थ्यांना नीट बसण्याची व्यवस्था नाही
पिण्यासाठी बोरिंगचे गढूळ पाणी
विजेच्या वायर अत्यव्यस्त अवस्थेत त्यामुळे विजेचा शॉक लागून मोठा अनर्थ होण्याची संभाव्य शक्यता.