दिल्ली विधानसभा निकालावर अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली आहे. Pudhari
Published on
:
08 Feb 2025, 6:19 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:19 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: Delhi Election Results 2025 |"राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. आरोप होत असतील तर ते कसे खोटे आहेत, ते जनतेसमोर मांडावे लागते". असे मत भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. दिल्ली विधानसभा निकालावर त्यांनी आज (दि.८) वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे हजारे म्हणाले की, सत्य नेहमी सत्य असते, खोटे हे खोटेच असते. जेव्हा आपची दिल्लीत एक बैठक झाली, तेव्हा पक्ष काढण्यावर एक बैठक झाली. यापासून मी सुरूवातीपासूनच दूर राहिलो. पण केजरीवाल यांनी यामध्ये स्वार्थीपणा केला, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. दारू घोटाळ्यामुळे आपचा पराभव झाला, आपने जनतेचा विश्वास गमावला आहे. राजकारणात आचार, विचार महत्त्वाचे आहेत हे आम आदमी पार्टीचे नेते विसरले, असेही ते म्हणाले.
"मी नेहमीच म्हटले आहे की उमेदवाराचे आचरण, विचार शुद्ध असले पाहिजेत. जीवन दोषरहित असले पाहिजे आणि त्याग असावा. हे गुण मतदारांना उमेदवारावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. मी हे अरविंद केजरीवाल यांना सांगितले पण त्यांनी लक्ष दिले नाही आणि शेवटी, त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित केले. हा मुद्दा का उपस्थित केला? ते पैशाच्या ताकदीने भारावून गेले होते", अशी टीका देखील अण्णा हजारे यांनी केली.
VIDEO | Delhi Election Results 2025: On trends suggesting lead for BJP, social activist Anna Hazare says: "I have always said that a candidate's conduct, thoughts should be pure, life should be without a blame, and sacrifice should be there... these qualities let voters have… pic.twitter.com/BGRq81XGIH
— Press Trust of India (@PTI_News) February 8, 2025