नाशिक मर्चंट बँकेचा मालेगाव शाखा व्यवस्थापक:सहव्यवस्थापक निलंबित, मालेगावच्या मिलन पटेलने 14 कोटी हवालामार्फत मुंबईला पाठवले

2 hours ago 1
नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत (नामको) १२ बेराेजगार तरुणांना फसवून उघडलेल्या खात्यातील १४ काेटींची रक्कम हवाला एजंट मिलन पाेपटलाल पटेल याने मुंबईला पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ईडीच्या पथकाने गुरुवारी सहा तासांच्या चाैकशीअंती पटेलला साेडले हाेते. यानंतर छावणी पाेलिसांनी त्याला रात्री उशिरा अटक केली. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला २२ नाेव्हेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्होट जिहादसाठी मालेगावात १२५ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी ईडी, सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर ईडीने बुधवारी मालेगाव, नाशिक, मुंबईसह अहमदाबाद, सुरत आदी ठिकाणी एकूण २३ जागांवर धाडी टाकल्या होत्या. दरम्यान, बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह सहायक व्यवस्थापकाला चाैकशी पूर्ण हाेईपर्यंत निलंबित करण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन साेहनलाल भंडारी यांनी दिली. छावणी पाेलिस ठाण्यात १२ बेराेजगार तरुणांना आमिष दाखवत खाते उघडून त्याद्वारे १२५ काेटीहून अधिक रकमेचे व्यवहार करत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. मुख्य सूत्रधार सिराज अहमद हारुण अहमद मेमन याला पाेलिसांनी पूर्वीच अटक केली असून १९ नाेव्हेंबरला त्याच्या पाेलिस काेठडीची मुदत संपत आहे. दरम्यान, मुंबईला ही रक्कम कुणाला दिली गेली याचा तपास सुरू असल्याची माहिती कॅम्प विभागाचे पाेलिस उपअधीक्षक सूरज गुंजाळ यांनी दिली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत दाेघांवर अटकेची कारवाई झाली आहे. ७ राज्यात २२ बँकातून ९८ कोटींचे व्यवहार नामको बँकेच्या मालेगाव शाखेत १२ खातेदारांनी करंट खाते उघडले हाेते. खाते उघडताना पॅन कार्ड, आधार कार्ड, व्यवसायाचे दाखले घेऊन उघडण्यात आले. पण पत्रव्यवहार करताना यात शाखास्तरावर अनियमितता आढळून आलेली आहे व त्याची अंतर्गत चौकशी तसेच पोलिस व इतर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. बँकेने संबंधित खाती गाेठवली आहेत. सर्व व्यवहार सुरळीत असून या घटनेतून बँकेचे आर्थिक नुकसान झालेले नाही. या सर्व प्रकरणात ९८ काेटींचे व्यवहार या खात्यांवरुन ७ राज्यांतून तसेच २२ बॅँकांतून एनइएफटी आणि आरटीजीएसद्वारे झाले आहेत. ईडीचे पथक रिकाम्या हाती मुंबई ईडीच्या दाेन पथकांनी मिलन पटेल व सिराज अहमद यांच्या घरांची गुरुवारी ६ तास झडती घेतली. परंतु, त्यात कुठलेही ठाेस पुरावे हाती लागले नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. ईडीने व्हाेट जिहाद व हवालाच्या अनुषंगाने चाैकशी केल्याचे समजते. आर्थिक गुन्हे शाखेचे पथकही तपास करत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article