नेत्रदीपक पालखी सोहळ्याने दुमदुमली श्रीक्षेत्र वरखेड नगरी:राष्ट्रसंतांचे गुरुवर्य संत आडकुजी महाराज पुण्यतिथी महोत्सव
2 hours ago
1
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत लहानुजी महाराज व संत सत्यदेव बाबा यांचे गुरुवर्य श्री आडकुजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र वरखेड येथे पालखी सोहळा सुरु झाला आहे. तिथीनुसार गुरुवारी सायंकाळी या सोहळ्याचा नेत्रदीपक प्रारंभ झाला. वंंदनीय राष्ट्रसंतांसह मंजुळा मातेची पालखी गुरुकुंज मोझरीच्या महासमाधीस्थळावरून निघाली. तर लहानुजी महाराज व सत्यदेव बाबा यांच्या पालख्या भाव स्थळापासून काढण्यात आल्या. या सर्व पालख्यांचे वरखेड येथे सकाळी आगमन झाले. वाटेत ठिकठिकाणी या पालख्यांचे गुरुदेव भक्ताकडून जोरदार स्वागत करण्यात आले. समर्थ आडकुजी महाराज यांच्या १०३ व्या पुण्यतिथी निमित्ताने महाराष्ट्रातील साधुसंत, राष्ट्रसंताचे प्रचारक,सामाजिक कार्यकर्ते, भाविक भक्तगण यानिमित्याने येथे दाखल झाले आहेत. याशिवाय अनेक चाहतेही पोहोचले आहेत. श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमातून सकाळी नऊ वाजता पालखी निघाली असून दिवसा ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तर वरखेड येथे मोहनराव बोके यांच्या उद्यानात स्वागत करण्यात आले. वरखेडच्या नागरिकांनी ठीक ठिकाणी स्वागत कमानी, रांगोळी, देखावे, फोटो व रोषणाईने स्वागत केले. महिलांनी हाती दीप आरती घेऊन महाराजांच्या स्वागतासाठी एक किलोमीटर पायपीट केली. हा पालखी सोहळा होता चित्ररथ, पताका, दिंड्यांमुळे दणदणीत झाला होता. वरखेड येथे समर्थाच्या महाद्वाराजवळ पालखीचे पूजन संस्था अध्यक्ष अभिजीत बोके, सचिव मनोहर बोके, अशोक अहिर, विक्रम बोके, विठ्ठल बोके, शोभा देशमुख, अनुराधा बोके तसेच सर्व विश्वस्त मडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीचे भावपूर्ण वातावरणात स्वागत केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. ट्रॅक्टरवर महाराजांची प्रतिमा पालखी सोहळ्यात समर्थ आडकुजी महाराज महासमाधीची प्रतिकृती समाविष्ट करण्यात आली होती. हार-फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरील त्यांची समाधी विशेष आकर्षण ठरली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)