पंढरीतील बाजारात 2100 जनावरांची खरेदी- विक्री:कार्तिकी यात्रेतील आर्थिक उलाढाल पन्नास टक्के घटली

6 days ago 2
कार्तिकी यात्रेवर राज्यभरात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीचा मोठा प्रभाव दिसून आला. त्यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या २५ ते ३० टक्का घटली. तसेच यात्रेनिमित्त होणारी आर्थिक उलाढाल ५० टक्के नि कमी झाल्याचे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे. वाखरी येथे झालेल्या जनावरांच्या बाजारात हि यंदा जनावरांची खरेदी विक्री अपेक्षेहून कमी झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. वर्षातील प्रामुख चार यात्रांपैकी कार्तिकी यात्रा हि दुसऱ्या क्रमांकाची यात्रा असते. दरवर्षी यात्रेसाठी ५ ते ६ लाख वारकरी येत असतात. तसेच याच यात्रेनिमित्त पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वाखरी येथे जनावरांचा बाजार भरवला जात असतो. यंदा आषाढी यात्रा विक्रमी गर्दीची झालेली होती. या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेला सुद्धा गर्दी होईल अशी अपेक्षा होती. परंतु राज्य विधानसभा निवडणुकीचा यात्रेवर मोठा परिणाम दिसून आला. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या यंदा घटली. विशेषतः या यात्रेसाठी कोकण आणि उत्तर कर्नाटक भागातील भाविकांची संख्या अधिक असते. कोकणात परतीचा पाऊस लांबला आणि विधानसभा निवडणूक असल्याने त्या भागातील भाविकांची संख्या नगण्य दिसून आली. याचा एकंदरीत परिणाम यात्रेनिमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीवर दिसून आला. तसेच यंदा यात्रेसाठी आलेला भाविक द्वादशीच्या दिवशी विठ्ठलाचा वार बुधवार असल्याने एकादशीच्या दिवशीच मोठ्या संख्येने परत गेला. द्वादशीच्या दिवशी दुपारनंतर पंढरपूर शहर नेहमी प्रमाणे सामान्य स्थितीला आले होते. बाजारात३ हजार ५०० जनावरांची आवक यात्रेनिमित्त वाखरी येथे भरलेल्या जनावरांच्या बाजारात यंदा जनावरांची आवक हि कमी झाल्याचे दिसून आले. यावर्षी सुमारे ३ हजार ५०० च्या जवळपास जनावरांची आवक झाली होती. त्यापैकी गाय, बैल, घोडा, म्हैस, २१०० जनावरांची विक्री सुमारे साडे तीन कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल वाढली असल्याचे बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article