पिण्याच्या पाण्यातून 273 जणांना‎ उलट्या, जुलाब; सहा जण गंभीर‎:नांदेड जिल्ह्यातील नेरली गावात आराेग्य पथक दाखल‎

1 hour ago 1
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या‎नेरली गावात २७३ नागरिकांना पिण्याच्या‎पाण्यातून विषबाधा झाल्याची‎धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री‎घडली. उलट्या, जुलाब आणि मळमळ‎सुरू झाल्याने त्यांना मिळेल त्या वाहनाने‎खासगी आणि शासकीय रुग्णालयात‎दखल करण्यात आले. २७३ पैकी सहा‎जण गंभीर असून त्यांच्यावर नांदेड‎येथील शासकीय रुग्णालयातील‎अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.‎ जिल्हा रुग्णालयात ९० तर अन्य रुग्ण‎विष्णुपुरी येथील शंकरराव चव्हाण‎वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत‎आहेत. गावात आरोग्य पथक तळ ठोकून‎आहे. गावात काही पथक रुग्णांवर‎उपचार करीत असून ज्यांना जास्त त्रास‎असणाऱ्यांना नांदेड येथे हलविले.‎दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी टाकीतून‎पाणीपुरवठा करण्यात आला. रात्री दहा‎वाजेनंतर नागरिकांना उलट्या झाल्या.‎ तपासणीसाठी पाण्याचे ‎नमुने प्रयाेगशाळेत पाठवले‎ आराेग्य विभागाने पाण्याचे नमुने नांदेड‎येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. पूर्वी‎साठवलेले जलस्रोत रिकामे केले गेले.‎गावात सध्या ४ पाण्याचे टँकर पोहोचले‎आहेत. पाण्याच्या टँकरचे क्लोरिनेशन‎करून ओटी टेस्ट करून गावकऱ्यांना‎पाणीपुरवठा केला जात आहे.‎ पाण्याच्या टाकीत माकड‎ पडल्याची अफवा‎ पाण्याच्या टाकीत माकड मेल्याची‎अफवादेखील पसरली. मात्र नागरिकांनी‎प्रत्यक्षात टाकीवर चढून पाहणी केली.‎तिथे मात्र काहीच आढळून आले नाही.‎ही अफवा असून टाकीतून पाणीपुरवठा‎बंद केल्याचे उपसरपंच शेख मिनार शेख‎ताहेर यांनी सांगितले.‎ सकाळीदेखील काही‎ नागरिकांना त्रास‎ नांदेड शहराजवळील नेरली गावातील‎नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यामुळे‎विषबाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी‎सांगितले. शनिवारी सकाळीदेखील‎गावातील काही नागरिकांना मळमळ,‎जुलाबाचा त्रास सुरूच होता, अशी माहिती‎समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विवेक‎पद्मने यांनी दिली.‎ घटनेनंतर गावकऱ्यांनी‎ रात्र काढली जागून‎ विषबाधेच्या घटनेनंतर गावातील‎नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण‎झाले होते. नागरिकांनी रात्र जागून काढली.‎नेमके काय होईल, कसे होईल या चिंतेत‎गावकरी होते. गावात हा प्रकार घडल्याची‎माहिती मिळताच आ. बालाजी‎कल्याणकर व अधिकाऱ्यांनी धाव घेतली.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article