‘पुढारी’मुळे विद्यार्थ्यांना लढण्याचे बळ

2 hours ago 2

‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत, रवींद्र खंदारे, जीवनधर चव्हाण, हरीष पाटणे, अजित साळुंखे व इतर.Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Jan 2025, 11:41 pm

Updated on

30 Jan 2025, 11:41 pm

सातारा : स्पर्धा हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनामध्ये आपण अनेक स्पर्धांचा भाग होत असतो. येणार्‍या भविष्याचा रोख ओळखून दै. ‘पुढारी’ने टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केले आहे. शाळांच्या विविध योजना घराघरांत पोहचवण्याचे काम वृत्तपत्र करत आहेत. दै. ‘पुढारी’ घराघरांत व वाचकांच्या मनामनांत पोहचला आहे, ‘पुढारी’मुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी लढण्याचे बळ मिळाले आहे, असे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी केले.

दै. ‘पुढारी’च्यावतीने घेतलेल्या पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण हे होते. यावेळी दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, वितरण विभागाचे संजय पोतदार, राज्य खाजगी शिक्षक -शिक्षकेत्तर महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे, शिक्षक प्रतिनिधी दिपाली बुधावले, पालक प्रतिनिधी राम कदम उपस्थित होते.

रविंद्र खंदारे म्हणाले, शालेय योजना घराघरांत पोहचवण्याचे काम वृत्तपत्र करतात. प्रशासनाच्या बाजूला उभे राहून बळ देण्याचे काम दै.‘पुढारी’ करत आहे. या बक्षिसांच्या रुपाने विद्यार्थ्यांच्या पाठीवर ही कौतुकाची थाप दिली आहे. विद्यार्थ्यांनो, स्पर्धेला घाबरु नका, असे यश मिळवा ज्यातून इतरांना प्रेरणा, हिंमत व उर्जा मिळेल. स्पर्धेत यश मिळवण्याचे हेच वय आहे. सातत्य व जिद्दीच्या जोरावर यश मिळवण्याची उर्मी तुमच्यात आली पाहिजे. दै. ‘पुढारी’तील कूपन्स स्पर्धेतील प्रश्नांची उत्तरे शोधण्यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होत आहे.

हरीष पाटणे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या टॅलेंट सर्च परीक्षेसाठी विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, विविध संघटना, शाळांचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकून पुढे गेला पाहिजे. यासाठी दै.‘पुढारी’ने हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत बक्षिसे मिळवली आहेत. स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू साध्य झाला असून शैक्षणिक गुणवत्तेत सातारा जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. ‘सातार्‍याची पोरं हुश्शार’ हे सिद्ध झाले आहे. सातार्‍याच्या एज्युकेशन सिस्टीमला दिशा देण्याचे काम दै. ‘पुढारी’ करत आहे, याचा अभिमान आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

जीवनधर चव्हाण यांनी ‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेसाठी सहभागी सर्व विद्यार्थी, पालक, तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. तसेच ‘पुढारी’च्या आगामी काळातील उपक्रमांना जिल्हा परिषद व शाळांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामारे जाण्याचे धाडस अशा परीक्षांमधून येते. एरवी 50 टक्के मुलेच स्पर्धा परीक्षेला बसतात. मात्र टॅलेंट सर्च परीक्षेत अगदी सामान्यातला सामान्य विद्यार्थीदेखील सहभागी करुन घेतला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी या परीक्षेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, असे मत शिक्षक प्रतिनिधी दीपाली बुधावले यांनी व्यक्त केले.

प्रास्तविक अजित साळुंखे यांनी केले. यावेळी वितरण प्रतिनिधी राजेंद्र मोझर, गणेश क्षीरसागर, पत्रकार प्रविण शिंगटे, सौ. मीना शिंदे उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article