पुस्तके व त्यातून डोकावणारी चित्रे भविष्यात घडवतील आदर्श पिढी:साहित्यिका डॉ. गोविलकर यांचे प्रतिपादन, जिल्हा वाचनालयात पुस्तकोत्सव‎

2 hours ago 1
माणसे ,लेखक, साहित्यिक हे येतील ,जातील परंतु पुस्तके ही सतत आपल्याशी बोलतात, शिकवतात, संवेदनशील बनवतात. आज बालदिनी महिला मंडळ बालक मंदिरच्या बालकांच्या हाती पडलेली पुस्तके व त्यातून डोकावणारी चित्रे भविष्यात आदर्श पिढी घडवतील. जिल्हा वाचनालयाने सुरू ठेवलेला हा वाचन संस्कृतीचा वारसा वाचन चळवळीस प्रेरक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. लिलाताई गोविलकर यांनी केले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बाल दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या सावेडी शाखेत आयोजित कार्यक्रमास त्या, बालकांशी संवाद साधताना बोलत होत्या.या प्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, उपक्रमाच्या प्रमुख संचालिका प्रा. ज्योती कुलकर्णी, महिला मंडळाच्या संचालिका ज्योती केसकर, मीनल गंधे, मुख्याध्यापिका अस्मिता शूळ,ग्रंथपाल अमोल इथापे, समन्वय सारिका देव, महिला मंडळ बालक मंदिराच्या शिक्षक वर्ग उपस्थित होता. प्रा. मोडक यांनी प्रास्ताविकात "आपल्या जीवनात चांगले आदर्श असतील तर आपले आयुष्यही चांगले घडते. पुस्तकांच्या सान्निध्यातून तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असल्याने त्याची सवय आतापासूनच अंगी बानवावा, असा आशावाद व्यक्त करून सावेडी वाचनालयात लवकरच उद्योजक किशोर नेवासकर यांच्या सहकार्यातून सुसज्ज बाल वाचनालय विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी महिला मंडळ बालक मंदिरच्या सर्व शिक्षक वृंदांचा पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. बालकांना सावेडी वाचनालयाच्या वतीने गोष्टीची पुस्तके भेट देण्यात आली. आभार महिला मंडळाच्या संचालिका ज्योती केसकर यांनी मानले. जिल्हा वाचनालय देणार बालकांना मोफत सभासदत्व उगवत्या पिढीत वाचनाचा वारसा वृद्धिंगत व्हावा असे पंडित नेहरूंचे स्वप्न होते. आज बालकांच्या हाती पडलेली पुस्तके हे त्याचेच प्रतीक आहे. यापुढेही जिल्हा वाचनालय बालकांसाठी मोफत सभासदत्व देणार असल्याचे उपक्रमाच्या प्रमुख संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article