फलटणजवळ महिलेचा सडलेला मृतदेह; शेजारी कापलेले केस:गुलाल, नरबळीचा संशय, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली आढळली

3 hours ago 1
फलटण तालुक्यातील विडणी गावात उसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचा अर्धवट सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने शुक्रवारी खळबळ उडाली आहे. मृतदेहाशेजारी गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली, असे साहित्य आढळून आल्यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय बळावला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. फलटण तालुक्यातील विडणी गावच्या हद्दीत प्रदीप जाधव यांच्या उसाच्या शेतात एका महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी आढळून आला. महिलेची हत्या करून तिचा मृतदेह उसाच्या शेतात टाकण्यात आला असावा, असा अंदाज घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. मृतदेह अर्धवट अवस्थेत आणि सडलेला आहे. मृतदेहाच्या कमरेखालील भाग हिंस्र प्राण्यांनी खाल्ला असावा, अशीही शक्यता आहे. मृतदेहाचा उर्वरित सडलेला भाग उसाच्या शेतातून शुक्रवारी दुपारी बाहेर काढण्यात आला. सध्या मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत महिलेचे धड गायब, कवटी दोन मीटर दूर: मृत महिलेचे धड गायब असून कवटी दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आली आहे. पोलिस मृताच्या धडाचा शोध घेत आहेत. घटनास्थळाच्या आजूबाजूला ९ ते १० एकर उसाचे क्षेत्र असल्याने मृतदेहाचा उर्वरित भाग शोधता येणे अवघड आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article