जीव लावणाऱ्याचा थंड डोक्याने खून, अटकेनंतरही शांत:गेममध्ये जिंकलेले 65 हजार रुपये प्रदीप हरला; त्यामुळे अल्पवयीन आरोपीने कट रचून काढला काटा

2 hours ago 1
मोबाइलमधील गेमचे कारण, गेममधील पैशांचा आर्थिक व्यवहार, थंड डोक्याने केला खुनाचा कट आणि जीव लावणाऱ्या मावसभावाचा 17 वार करून निर्घृण खून... उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनीत संक्रांतीच्या दिवशी प्रदीप निपटे या युवकाच्या खुनाची उकल करण्यात पोलिसांना तिसऱ्या दिवशी यश आले. या तपासातून पुढे आलेली धक्कादायक बाब म्हणजे मृत प्रदीपचा मावसभाऊ संदीप (अल्पवयीन असल्याने काल्पनिक नाव) याने हा खून केल्याचे पुढे येत आहे. अठरा वर्षे पूर्ण होण्यास सहा महिने बाकी असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, निरीक्षक अतुल येरमे, अमित गोरे यांच्या पथकाने तीन दिवसांत गुन्ह्याची उकल केली. मोबाइल फेकला नाल्यात आयडी सारखेच असल्याने त्याने प्रदीपचा मोबाइल नाल्यात फेकून दिला. जंबियाने (मोठ्या चाकूने) हा खून केल्याची कबुली दिली. शस्त्राचा पोलिस शोध घेत आहेत. प्रदीप आणि संदीप यांच्यात पैशावरून वाद, झटापट झाल्याचे पुढे येत आहे. वडिलांना धक्का; रुग्णालयात दाखल मुलाचा खून झाल्यानंतरदेखील प्रदीपच्या वडिलांचा रूम पार्टनरपैकी कुणावर संशय नव्हता. नात्यातील मुले असल्याने त्यांनी कुणावरही आरोप केला नाही. मात्र ही हत्या संदीपनेच केल्याचे कळल्यावर त्यांची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. अशी झाली गुन्ह्याची उकल 1 रूममध्ये इतर कुणी व्यक्ती आल्याचे पुरावे न मिळाल्याने पोलिसांचा पहिल्या दिवसापासून रूम पार्टनरवरच संशय होता. पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. प्रत्येक अधिकाऱ्याने प्रत्येकाला तेच तेच प्रश्न विचारले. त्यात संशयित संदीपच्या उत्तरांमध्ये वेळेची तफावत आढळल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. 2 खुनानंतर पोलिसांना दिलेल्या जबानीत आपण पतंग उडवण्यासाठी बायपासला गेल्याचे संशयिताने सांगितले. प्रत्यक्षात तो तेथे पतंग उडवत नसून फक्त भटकत असल्याचे सीसीटीव्ही तपासातून पोलिसांच्या निदर्शनास आले 3 मृत प्रदीप आणि संशयित संदीप या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे पोलिसांना तपासात सापडले. या तिन्ही धाग्यांमुळे संदीपवरील संशय बळावला. अखेरीस पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नाते जिवाभावाचे, खुनशी तरी चेहरा शांत प्रदीप बीसीएस, तर संदीप एनडीएची तयारी करीत होता. ते जिवलग मित्र होते. खुनानंतर संदीप दुःखात असल्याचे भासवत होता. प्रदीपच्या फोटोसह ‘मिस यू’चे मेसेज पोस्ट केले. चौकशीदरम्यान तो शांत होता. ताब्यात घेतल्यावरसुद्धा चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता. अल्पवयीन कोण? मो बाइलमधील गेमचे निमित्त काय अन् आपल्याला शहरात आणणाऱ्या मावसभावाचा काटा काढण्याचा कट केला. हत्यार मिळवले, संधीची वाट पाहिली आणि संधी मिळताच डाव साधला. स्वत:चा बचाव करण्याचा प्लॅनही केला. शांत डोक्याने सर्व पुरावे नष्ट करून त्याच्या मृतदेहाशेजारी थंडपणे ‘गेम’ खेळत बसला. हे सारं या आरोपीने सहा महिन्यांनी केलं असतं तर शिक्षा झाली असती जन्मठेप. मात्र, केवळ सहा महिने कमी आहेत म्हणून कायद्याच्या भाषेत हा आरोपी ठरत आहे ‘विधिसंघर्षग्रस्त बालक’! अल्पवयीन असल्याचा बचाव करीत ‘ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट’नुसार त्याला फक्त सुधारगृहात ठेवले जाईल. पण, त्याच्या क्रौर्याचे मोजमाप कसे करणार? त्याला सहा महिन्यांआड बचावाची संधी मिळू नये, ही तपास यंत्रणा आणि न्यायालय या दोघांची कसोटी असेल. अन्यथा खरे अल्पवयीन कोण, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत राहील. मोबाइलमधील गेममुळे भावनांचा कडेलोट मुलांना मोबाइलमधील गेमचे व्यसन लागले आहे. त्यामुळे एकटेपणा वाढत आहे. परिणामी मुले नैराश्यात जातात. भावना प्रकट होत नसल्याने मीपणा, अहंकार वाढत आहे. त्यातून आलेला राग कशावर तरी काढला जातो. या घटनेमध्येही मृत मुलगा याचाच बळी ठरल्याची शक्यता आहे. अशा घटना रोखण्यासाठी मोबाइलपासून दूर राहून मित्र-नातेवाइकांसोबत संवाद साधणे आवश्यक आहे. 18 वर्षांच्या खालील मुलांना मोबाइल किंवा इंटरनेट वापरावर बंदी येणे अपेक्षित आहे. - डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष, राज्य मानसशास्त्र परिषद

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article