बनकिन्होळा परिसरात तुरीचे पीक जोमात; उत्पन्न वाढणार
5 hours ago
1
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह बाभूळगाव बु ., वरखेडी, भायगाव, तलवाडा, गव्हाली, गेवराई सेमी, चिंचखेडा, भवन आदी परिसरात यंदा सुरुवातीपासूनच पाऊस चांगला झाला. यामुळे सध्या कपाशी पिकामध्ये आंतरपीक म्हणून काही शेतकऱ्यांनी तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र अन्य पिकांच्या तुलनेत सध्या तरी तुरीकडे पाहून समाधान होत आहे. तुरीच्या शेताला सध्या हळदीचा पिवळा रंग चढला आहे. सध्या उंच वाढलेल्या तुरी आता शेंगा आणि फुलांनी वाकू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतात बहरलेल्या तुरीच्या पिकात पिवळी लागडलेली फुले नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अति पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र त्या तुलनेत तुरीला कमी प्रमाणात फटका बसला. सध्या तुरीच्या शेतात पिवळ्या फुलांनी हळदीप्रमाणे रंग चढवला आहे. आता त्या तुरीच्या झाडांना शेंगा लगडत आहेत. शेंगांच्या ओझ्याने तुरी झुकत आहेत. असेच तुरीचे पीक जोमात राहिल्यास अन्य पिकाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना तुरीचा हातभार लागेल असे चित्र दिसत आहे. तुरीच्या शेंगांना मोठी मागणी सध्या ग्रामीण भागातील तुरीच्या शेंगांची आता मार्केटमध्ये मोठी आवक होत आहे. यामुळे या शेंगांना बाजारात मोठी मागणी आहे. सध्या ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे या शेंगांची विक्री केली जात आहे. किरकोळ विक्रेते मार्केटमधून याची खरेदी करत आहेत. यातून हातगाडीवर आणि खुल्या बाजारात याची विक्री होताना दिसते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)