Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात फार मोठी आहे. गेल्या तीन दशकांपासून अभिनेता चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आता किंग खानची मुलं आर्यन खान, सुहाना खान यांनी झगमगत्या विश्वात पदार्पण केलं आहे. आता आर्यन खान आणि शाहरुख खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये किंग खान मुलाला, ‘बाप का राज है क्या?’ असं म्हणताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये शाहरुख खान डायलॉग बोलतो – ‘पिक्चर तो सालों से बाकी है, लेकिन…’ पण अभिनेत्याचा अंदाज दिग्दर्शकाला आवडला नसल्यामुळे दिग्दर्शक रिटेक घ्यायला लावतो. रिटेकवर रिटेक झाल्यामुळे शाहरुख खान भडकतो आणि म्हणतो, बाप का राज है क्या? त्यानंतर कळतं दिग्दर्शकाच्या खुर्चीवर दुसरा तिसरा कोणी नाही तर, आर्यन खान बसलेला असतो आणि आर्यन म्हणतो ‘हा…’ सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आर्यनच्या शोचा अनाउन्समेंट व्हिडिओ शेअर करताना किंग खानने कॅप्शनमध्ये लिहिलं – पिक्चर तो सालों से बाकी है पर शो तो अब शुरू होगा। The Ba**ds of Bollywood लवकरच येत आहेत.’ किंग खानच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
किंग खानने सुहाना आणि आर्यनसाठी चाहत्यांकडून मागितलं प्रेम
नेटफ्लिक्सच्या इव्हेंटमध्ये देखील शाहरुख खानने मागितलं प्रेम… किंग खान म्हणाला, ‘माझी फक्त एकच प्रार्थना आहे… एक विनंती आणि इच्छा आहे की, माझा मुलगा दिग्दर्शन क्षेत्राकडे वळत आहे. मुलीने अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्या दोघांनी 50 टक्के लोकांनी प्रेम दिलं तरी आनंद आहे.. जेवढं प्रेम मला दिलं… मला चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम फार आहे…’
सीरिजबद्दल शाहरुख खान म्हणाला, ‘मी सीरिजचे काही एपिसोड पाहिले आहेत आणि मला ते फार आवडले. एपिसोड फार फनी आहेत. मला फनी गोष्टी फार आवडतात.. पण लोकांना वाईट वाटतं. म्हणून मी मस्करी करणं देखील सोडलं आहे. हा वारासा मी आर्यनला दिला आहे… आता तू जाऊन तुझ्या वडिलांचा नान रोशन कर.’ सध्या सर्वत्र आर्यन खानची आगामी सीरिज The Ba**ds of Bollywood ची चर्चा रंगली आहे.