बिटकाॅईन घाेटाळा प्रकरणी चाैकशी व्हावी:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांची मागणी

3 days ago 2
बिटकाॅईन घाेटाळा गंभीर असून त्याची सत्यता तपासली पाहिजे. माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांनी केलेल्या आराेपाची चाैकशी हाेणे गरजेचे आहे. हा गुन्हा सिध्द झाल्यास महाराष्ट्रातील सर्वात माेठा घाेटाळा हा असेल. जे भ्रष्टाचारावर बाेलतात व समाेरच्याला शिकवतात त्यावेळी आपणास ती नैतिकता हाेती का? याबाबत विचार करणे गरजेचे आहे. आज मी कुटुंबा साेबत मतदान केले असून सत्ता असताना आम्ही जे काम केले त्यानुसार आम्ही मतदार यांच्यापर्यंत पाेहचलाे आहे. जनता आमच्यासाेबत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचा कल हा महायुतीच्या बाजूने आहे. 58 पैकी 45 मतदारसंघात महायुतीचा विजय हाेईल व राज्यात महायुतीचे सरकार येईल असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक कामाच्या माध्यमातून पाेहचलाे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नागरिकांनी मतदान नक्की करावे यासाठी आग्रह मी आज धरला. राजकीय क्षेत्रात जाऊन सामाजिक काम करणे हा संस्कार आमच्यावर असून त्यानुसार काम करताे. सामाजिक कामाच्या माध्यमातून अनेक नागरिकांपर्यत मतदारसंघात मागील पाच वर्षात पाेहचलाे. मागील निवडणुकीत निवडणुकीपूर्वी तयारी करण्यास वेळ नव्हता परंतु यंदा ताे वेळ मिळाला. राज्यात 160 जागा आघाडीच्या येतील शिरुर मतदारसंघाचे खासदार अमाेल काेल्हे म्हणाले, राज्याचा स्वाभिमान राखण्यासाठी मी मतदान केले असून महाराष्ट्राचा अभिमान व स्वभिमान राखण्याकरिता सर्वांनी मतदान करावे. महाराष्ट्रात निवडणुक जिंकता येत नाही हे भाजपच्या लक्षात आल्याने राज्याचा स्वाभिमान खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र त्यांच्या हाती साेपवला की, गुजरातची गुलामगिरी हाेऊन राेजगार तिकडे जातात. राज्यातील जनतेने स्वाभिमान कसा राखयचा याचा निर्णय घेतलेला आहे. जनतेला गद्दारी आवडत नाही. राजकीय घडामाेडी वेगळयाप्रकारे झाल्या असून त्यातून मतदारांचा अपमान झाला आहे. शेतकरी, युवक, महिला यांच्यात नाराजी आहे त्यामुळे सुरक्षित हातात जनतेला सत्ता साेपवयाची आहे. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात येईल व 160 ते 170 जागा निवडून येतील.खा. सुप्रिया सुळे यांच्यावर बिनबुडाचे आराेप करुन भाजप रडीचा डाव खेळत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article