बोर्डापाठोपाठ आता सीईटी सेलचे 19 प्रकारच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर:सीईटी सेलच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा
20 hours ago
2
छत्रपती संभाजीनगर राज्य मंडळाने नुकतेच दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निश्चित तारखा जाहिर केल्या आहेत. त्यापाठोपाठ सीईटी सेलनेदेखील १९ प्रकारच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार ९ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. वेळापत्रक आधीच आल्याने विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी फायदा होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यासाठी सीईटी सेलकडून १९ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांतील गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. इतर राज्यांच्या तुलनेत बोर्ड परीक्षांचे निकाल आणि सीईटीचे निकाल लांबल्यावर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अडचण होत असते. परंतु आता आधीच वेळापत्रक जाहीर झाल्याने निकालही लवकर लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठीचा मार्गही मोकळा होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळे आता या नव्या वेळापत्रकानुसार या परिक्षांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सीईटीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केला. असे आहे वेळापत्रक - { शिक्षणशास्त्र पदवी - १६ मार्च { ३ वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रम सीईटी - २० ते २१ मार्च { एमसीए सीईटी २३ मार्च { बीएड (जनरल अँड स्पेशल) बीएड एलसीटी - २३ ते २५ मार्च { बी.डिझाइन - प्रवेश परीक्षा २९ मार्च { बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीसीए सीईटी - १ ते ३ एप्रिल { नर्सिंग अभ्यासक्रमाची सीईटी ७ व ८ एप्रिलला { ९ ते १७ एप्रिल या कालावधीत पीसीबी तर १९ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत पीसीएम. ^यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करत त्या परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस आधी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सीईटी सेलनेदेखील तसेच नियोजन करत परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी होणार असून यामुळे परीक्षेचे अर्ज भरतानाही विद्यार्थ्यांना उपयोग होईल. आर.बी. गरुड, माजी उपप्राचार्य देवगिरी महाविद्यालय सीईटी सेलकडून १९ परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांतील गुणांच्या आधारे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)