भरतनाट्यम-लोकनृत्याची घातली सांगड;‎ "कलाश्री''च्या नृत्यांगनांचे देवीला साकडे‎:महिनाभराच्या सरावाने दीड तासाचा कार्यक्रम, 42 कलावंतांनी केली 14 नृत्ये‎

2 hours ago 1
संपूर्ण शहरात विविध मंदिरांत देवीचा‎जागर सुरू आहे. नृत्य, नाट्य, गायन‎अशा विविध कलांतून देवीला सेवा‎अर्पण केली जात आहे. जळगाव‎रोडवरील एन-९च्या रेणुकामाता‎उत्सवात कलाश्री अकादमीचे‎रविवारी सादरीकरण झाले. दीड‎तासाचा हा कार्यक्रम होता.‎भरतनाट्यम आणि लाेककलेचे १४‎प्रकार सादर करण्यात आले. ४२‎शिष्यांनी महिनाभर सराव करत हे‎सादरीकरण केले.‎ रेणुकामाता मंदिराच्या प्रांगणात‎कलाश्री अकादमीच्या शिष्यांनी‎दमदार सादरीकरण केले. भाविकांना ‎‎सहभागी करून घेणारा हा सोहळा‎होता. गणेशवंदनेने कार्यक्रमाची‎सुरुवात झाली. शारदास्तुती, सरस्वती ‎‎वंदना, लक्ष्मीवंदना, भवानी कौत्वुकम‎या पारंपरिक भरतनाट्यम प्रस्तुतीनंतर ‎‎गाेंधळ, जोगवा झाला. जोगव्यावर ‎‎अाबालवृद्धांनीही ताल धरला होता.‎ नव्या पिढीसाठी आकर्षण‎ या कार्यक्रमांचे आयोजन आम्ही जाणीवपूर्वक करतो. कला‎सादरीकरण म्हणून याकडे न पाहता देवी महात्म्य काय आहे,‎याची ओळख नव्या पिढीला करुन देणे गरजेचे आहे.‎महाराष्ट्रातील भक्ती परंपरा सर्वांना सोबत घेऊन सांगड‎घालणारी आहे. याचा आम्ही पुरस्कार करतो.‎ -सतिश वैद्य, अध्यक्ष, रेणुकामाता मंदिर संस्थान.‎ देवीचा महिमा भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न‎ जागर देवीचा रेणुकामाता मंदिरात गेली १४ वर्ष नवरात्रीनिमित्त भजन,‎कीर्तन, कथा, पठणासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले‎जाते. याद्वारे देवीचा जागर करण्याची परंपरा आहे. कला, संस्कृतीच्या‎माध्यमातून देवीचा महिमा भाविकांपर्यंत पोहचवण्याचा हा‎आयोजकांचा प्रयत्न आहे.‎ -विक्रांत वायकोस, संचालक कलाश्री अकादमी.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article