भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे. Pudhari News Network
Published on
:
19 Nov 2024, 10:25 am
Updated on
:
19 Nov 2024, 10:25 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : मतांसाठी पैसे वाटल्याच्या आरोपावरुन निवडणूक भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप-बाविआ आमनेसामने
विधानसभा निवडणुकीदरम्यान (Maharashtra Election 2024) पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे (Vinod Tawde) यांना बहुजन विकास आघाडीच्या (बाविआ) कार्यकर्त्यांनी तब्बल तीन तास घेरल्याची घटना घडली. त्यातून भाजप आणि बाविघा कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षीतिज ठाकूर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पैसे वाटपाच्या आरोपावरून गोंधळ उडाला.
बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले.
विरार पूर्व भागात असलेल्या मनवेलपाडा येथील एका हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले. त्यातून बाविआचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात चांगली जुंपली. काही वेळातच आमदार क्षीतिज ठाकूरही तेथे पोहोचले. या प्रकरणानंतर हॉटेलमध्ये मोठा पोलिस फाटा तैनात करावा लागला, तसेच पोलिसांनी हॉटेल सील केल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.