भाजपच्या भरघोस यशानंतरही शिंदेंचा मुख्यमंत्रिपदावर दावा:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीतून घेणार अंतिम निर्णय
2 hours ago
1
विधानसभा निवडणुकीत ५७ जागा जिंकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्साहात आहेत. त्यामुळेच ते सध्या मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडायला तयार नाहीत. या कारणामुळे भाजपच्या कोअर ग्रुपमधील नेते आणि शिंदे गटाच्या कोअर कमिटीतील नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षांत विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक काम केले. त्यांनी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना आणली, ती या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवा, असे शिंदे गटाचे नेते सांगत आहेत. ‘महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार?’ हा निर्णय आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीत घेणार आहेत, असे शिंदे गटाच्या नेत्यांचे मत आहे. प्रचारात एकनाथ शिंदे हे सर्वाधिक लोकप्रिय चेहरा ठरले होते. त्यामुळे भाजपचे नेते त्यांना नेहमीच सभांमध्ये अधिक महत्त्व देत. मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेते बॅकफूटवर असताना मुख्यमंत्री शिंदे यांनीच पुढे येऊन हा विषय हाताळला. त्यामुळे आता शिंदे यांनाच पुन्हा संधी मिळावी, अशी शिंदेसेनेच्या नेत्यांची मागणी आहे. दरम्यान, आता निकालानंतर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा ठराव, शिवसेनेत मंजूर करण्यात आला. मात्र, तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)