कॅन्टोन्मेंट परिसरात मतदानाला जात असताना भाजपा उमेदवार सुनील ज्ञानदेव कांबळे आणि त्यांच्या समर्थकांनी आम्हाला शिवीगाळ करीत मारहाण केली. भाजपला मतदान करा, नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप काशेवाडीतील मतदारांनी केला आहे. याप्रकरणी सुरेखा राजू खंडाळे यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. संबंधित उमेदवाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी अर्जाद्वारे केला आहे. तक्रारी अर्जानुसार सुरेखा खंडाळे, मीरा हेमंत बिघे, पारु दहातोंडे जायदा शेख या २० नोव्हेंबरला दुपारी पावणेएकच्या सुमारास गोल्डन जुबली एड्युकेशन ट्रस्ट या ठिकाणी मतदानाला जात होत्या. त्यावेळी भाजपा उमेदवार सुनील कांबळे, तुषार तानाजी पाटील, तनवीर तानजी पाटील, अरविंद जाधव, आकाश अविनाश पाटोळे, सनी अडागळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यानी आम्हाला धक्काबुक्की केली, आमच्या अंगावर हात टाकून विनयभंग केला. आमच्याविरूद्ध कुठे तक्रार केल्यास त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. मी इथला स्थानिक आमदार आहे, राज्यात आमचाच गृहमंत्री आहे, तुम्हाला सगळ्यांना खलास करून टाकतो अशी सुनील कांबळे यांनी धमकी दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे मतदानापासून राहिलो वंचित दयानंद अडागळे, ज्योती अडागळे, आरती रमेश अडागळे, हितेशा दत्तात्रय अडागळे हे मिळून गोल्डन जुबली बुथ क्रमांक १९६ वर मतदान केंद्रात उभे होते. त्यावेळी तनवीर तानाजी पाटील, तुषार पाटील हे पाच ते सहा साथीदारांसह त्याठिकाणी आले. त्यांनी दयानंदला मतदान करण्यापासून वंचित ठेवले. धक्काबुक्की करीत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच भाजपला मतदान करा, नाहीतर तुम्हाला बघून घेउ अशी धमकी दिल्याचा तक्रारी अर्ज दयानंद राजू अडागळे यांनी खडक पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)