मंत्रिमंडळात भाजप मोठा भाऊ, दोन उपमुख्यमंत्री:मराठवाडा-विदर्भाची महायुतीला साथ, राज्यात सर्वत्र भगवा
2 hours ago
1
महायुतीने घडवला इतिहास 1972 मध्ये काँग्रेसला सर्वाधिक 222 जागा मिळाल्या होत्या. हा विक्रम 230 जागा जिंकून महायुतीने मोडला आहे. ऐतिहासिक यशासह भाजपच सर्वात मोठा पक्ष बनल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते. आता काय होणार समजून घ्या ऐतिहासिक यशासह भाजपच सर्वात मोठा पक्ष बनल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर परिणाम काय?
पक्षफुटीनंतर मोठे अपयश आल्याने शरद पवार-ठाकरेंचे लोक आणखी फुटू शकतात. पक्षबांधणीचे मोठे आव्हान पेलताना प्रकृती, वयामुळे पवारांना मर्यादा. ठाकरे आदित्यला पुढे करतील. जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाचे पुढे काय?
मनोज जरांगे पुन्हा उपोषण सुरू करणार. त्यात १ लाख लोकांना सहभागी करून घेण्याचा इशारा त्यांनी दिलाय. मात्र आता त्यांच्या आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी शंका. लाडक्या बहिणींना आता २१०० रु. कधीपासून?
याच योजनेवर यश मिळाल्याने सरकार २१०० रुपयांचे वाटप लवकरच सुरू करील. मात्र २.५ लाख उत्पन्न मर्यादेच्या निकषाची पडताळणी करून २.३ कोटींवरील लाभार्थीची संख्या घटवतील. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधीपासून मिळेल? २ किंवा ३ लाखांपर्यंत कृषी कर्ज माफीचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला जाऊ शकतो. मात्र तिथेही पॅन कार्डची तपासणी करून नोकरदार शेतकऱ्यांना या लाभापासून दूर ठेवले जाईल.
मुंबईत दाेन्ही शिवसेनेत ११ ठिकाणी आमनेसामने लढाई झाली. यात ६ मतदारसंघात उद्धवसेना तर ५ ठिकाणी शिंदेसेनेचे उमेदवार विजयी झाले. मराठवाड्यात युतीला ८ जागांचा फायदा लोकसभेला या भागात जरांगे फॅक्टरमुळे युतीला एक जागा मिळाली होती. या वेळी जरांगे फॅक्टर न चालल्याने युतीला २०१९ पेक्षा ८ जागा जास्त. विदर्भात आघाडीने गमावल्या ६ जागा २०१९ च्या तुलनेत युतीने १२ जागा जास्त कमावल्या तर महाविकास आघाडीने ६ जागा गमावल्या. प. महाराष्ट्रात आघाडीला १९ चा फटकायुतीने २०१९ पेक्षा १८ जागा जास्त कमावल्या, तर आघाडीने १९ जागा गमावल्या. शरद पवारांना फक्त ७ जागा मिळाल्या.
उ. महाराष्ट्रात युतीला १०चा फायदा युतीने २०१९ पेक्षा १० जागा जास्त कमावल्या. तर आघाडीला ९ जागांचा फटका बसला. एकनाथ खडसे यांच्या कन्या राेहिणी यांचा पराभव झाला. मुंबई-कोकणात ५६ जागा युतीला एकूण जागा ३६. त्यात महायुतीला २३ तर महाविकास आघाडीला १३ जागा मिळाल्या. मुंबई व कोकणात एकूण ७५ जागा आहेत. त्यापैकी युतीला ५६ तर आघाडीला फक्त १६ जागांवर समाधान.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)