Published on
:
18 Jan 2025, 12:30 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:30 am
पेडणे : पेडणेचे मगोचे माजी आमदार परशुराम कोटकर यांचे शुक्रवारी सकाळी अल्प आजाराने गोमेकॉ इस्पितळात निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. गोवा विधानसभेत ते 1989 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. कोटकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दुःख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याला घटक राज्य दर्जा मिळाल्यानंतर पहिल्या विधानसभेचे ते आमदार होते. त्यांच्या निधनाने मला अतिव दुःख होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. मगोचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, कोटकर यांचे पक्षासाठी फार मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने पक्षाने निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. कोटकर मगो पक्षाचे निष्ठावंत नेते होते, असे मत मांद्रेचे माजी जि. पं. सदस्य श्रीधर मांजरेकर यांनी व्यक्त केले. यावेळी मंत्री दीपक ढवळीकर, माजी आमदार नरेश सावळ, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे यांनी कोटकर यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.