पिंपरी: वाल्मीक कराड प्रकरणात कुणी काय आरोप केले यांची मला माहिती नाही. ‘सीआयडी’, ‘एसआयटी’ यांच्यावर चौकशीची जबाबदारी आहे. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चौकशी करावी. कुणाच्या दवाबाखाली येऊ नये, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.17) स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे आयोजित दिव्यांगांच्या पर्पल महोत्सव या कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, वाल्मीक कराड प्रकरणात वेगवेगळे लोक रोज वेगवेगळी माहिती देत आहेत. त्या माहितीची दखल घेऊन ‘सीआयडी’ व ‘एसआयटी’ चौकशी करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.