ऑडिशन द्यायला जाताना टीव्ही अभिनेता अमन जायस्वालचा अपघातात मृत्यू झालाInstagram
Published on
:
18 Jan 2025, 4:40 am
Updated on
:
18 Jan 2025, 4:40 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - टीव्ही अभिनेता अमन जायस्वाल याचा अपघातात मृत्यू झाला. अमन जायस्वालने 'धरतीपुत्र नंदिनी' मध्ये काम केलं होतं. अमन २३ वर्षांचा होता. तो ऑडिशन द्यायला जात असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आलीय. अमनच्या बाईकला ट्रकने टक्कर दिली. ही दुर्घटना जोगेश्वरी हायवेवर झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेबद्दल अंबोली पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमन जयस्वालला कामा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्या मृत घोषित केलं.
अमनला ओळखत असणाऱ्यांनी सांगितले की, त्याला बाईक चालवण्याची खूप आवड होती. तो मुंबईमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बाईकचा वापर करायचा. अमनला बाईक चालवण्याची इतकी आवड होती की, त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाईक राईड करतानाचे तमाम व्हिडिओ अपलोड केले आहेत.