मतदान गायब झाले! राज ठाकरे यांचा ईव्हीएमवर हल्ला

2 hours ago 2

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. निवडणुकीत लोकांनी मनसेला मतदान केले, पण ते मतदान गायब झाले असे म्हणत त्यांनी ईव्हीएमवर हल्ला चढवला. अशा प्रकारे निवडणूक लढवायची असेल तर कशाला निवडणूक लढवायची? असा संतप्त सवाल करतानाच, ही गोष्टही निघून जाईल, पुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

मनसे पदाधिकाऱयांचा मेळावा आज वरळी डोम येथे पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. निवडणुकीचा निकाल आपल्याला पटलेला नाही, असे म्हणत त्यांनी काही उदाहरणेही दिली. भाजपला 132 जागा आल्या हे समजू शकतो. पण लोकसभा निवडणुकीत एक खासदार निवडून आलेल्या अजित पवार यांचे विधानसभेत चार-पाच आमदार निवडून येतील याबद्दल पुणाला शाश्वती नव्हती. त्यांचे 42 आमदार निवडून येतात आणि ज्यांच्या जिवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवार यांचे फक्त 10 आमदार, हे समजण्यापलीकडचे आहे, चार महिन्यांत लोकांचे मत इतके कसे बदलले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राजू पाटलांना त्यांच्याच गावात फक्त एकच मत कसे

एका गावात मनसेच्या राजू पाटील यांनाच मतदान होते. 1400 मतदान आहे तिथे. पण राजू पाटील यांना त्यांच्याच गावात एकच मत मिळाले. हे कसे काय शक्य आहे? संपूर्ण गावात एकही मत मिळाले नाही? असा सवाल करत राज ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले.

…इतना सन्नाटा क्यूँ है भाई?

निकालानंतर संघाशी संबंधित एक व्यक्ती आपल्याकडे आली होती. ते मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यूँ है भाई? कोई तो जिता होगा, असे म्हणत राज ठाकरे यांनी निकालानंतर महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला ते कसले द्योतक आहे? असा सवालही उपस्थित केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article