मनसे जाहीरनाम्यात ‘लाडकी बहीण’सारखी योजना नाही:अशा घोषणांना अर्थ नाही, राज ठाकरे यांचा दावा

2 hours ago 1
महायुतीने जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना दीड हजारावरून २१०० रुपये, तर महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेतून ३ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. वंचितने महिलांसाठी ३५०० रुपये जाहीर केले आहेत. मात्र मनसेच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी आर्थिक मदतीच्या कोणत्याही योजनेचा समावेश नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी मध्यमवर्गीयांची मते मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेकडे दुर्लक्षाचा नवा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे. जाहीरनामा प्रकाशनप्रसंगी राज राज म्हणाले की, महाराष्ट्राचं आर्थिक गणित पाहिल्याशिवाय असल्या घोषणा करू शकत नाही. अशा घोषणा करण्यात अर्थ नाही. राज्यावर बोजा न येता या गोष्टी करता आल्या तर मी याला गिफ्ट म्हणेन. मात्र नंतर या गोष्टी करता आल्या नाहीत तर मी याला लाच म्हणेन. महिलांना पैसे मिळतात यात आनंद आहे. मात्र यातून आपण खड्डे तर खणत नाही ना याचा विचार केला पाहिजे. दरम्यान, मनसे राजीनाम्यात मुबलक रेशन, शुद्ध पाणी, परवडणारी घरे, नव्या झोपड्यांना विरोध आदी मुद्दे आहेत. विद्यामंदिरे उभी करावीत उद्धवसेनेच्या जाहीरनाम्यात असे म्हटले आहे की, प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करणार. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात चौकाचौकात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. त्यामुळे राज्यातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी विद्यामंदिरे उभी करावीत. गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article