केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदाह हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकरासाठी काय केलं? असा सवाल यावेळी अमित शाह यांनी उपस्थित केला आहे. तसेच महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलं असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांचा 46 हजार कोटी रुपये टॅक्स कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलं. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकरासाठी काय केलं? मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं आहे, जमिनीवर राहून काम करणे गरजेचं असतं असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला आहे.