महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडीने ग्रँड हयात हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' निवासस्थानीही राजकीय चर्चा सुरू आहेत. नारायण राणे यांची एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाल्याने राजकारणात आणखी एक नवीन वळण आले आहे. तसेच सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आणि बंडखोर उमेदवार निर्णायक भूमिका बजावू शकतात, असादेखील अंदाज वर्तवला जात आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मतदान पार पडून आता 24 तासांचा कालावधी पूर्ण होत नाही तेवढ्यात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या पोटात प्रचंड राजकीय हालचालींना वेग आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी जे घडलं, फोडाफोडीचं राजकारण घडू नये, यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात अपक्ष आणि बंडखोर उमेदवार हे निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी किंगमेकर ठरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी प्रचंड सक्रिय झाली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत तीनही पक्षांचे तीन प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी देखील खल सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत निवडणुकीनंतरच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उपस्थित असण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. कदाचित या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
नारायण राणे एकनाथ शिंदेंच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील अशाच काही घडामोडी घडत आहे. विशेष म्हणजे भाजप खासदार नारायण राणे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी नारायण राणे शिंदेंच्या भेटीसाठी गेले आहेत. विशेष म्हणजे काल झलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला जास्त महत्त्व आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली आहे. त्यानंतर नारायण राणे प्रत्यक्ष शिंदेंच्या भेटीला गेल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. या भेटीत काय ठरतं? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.